सीडब्ल्यूएसएन विद्यार्थ्यांना लॅपटॉपची मुभा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 मार्च 2018

मुंबई - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांना 5 मार्चपासून सुरुवात होणार आहे. चिल्ड्रन्स विथ स्पेशल निड्‌स (सीडब्ल्यूएसएन) या वर्गवारीत विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी स्वतःच्या लॅपटॉपचा वापर करण्याची मुभा देण्यात आली आहे; मात्र त्यांना लॅपटॉपवर इंटरनेटची सुविधा वापरता येणार नाही. 

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरील अधीक्षकांना त्याबाबतचे निवेदन द्यावे लागेल. उत्तरपत्रिकांतील अक्षरांचा आकार मोठा करण्यासाठीही हे विद्यार्थी संगणक वापरू शकतात. 

सीबीएसईतर्फे घेतली जाणारी दहावीची परीक्षा 5 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान होईल. देशभरातून 16 लाख 38 हजार 428 ही परीक्षा देणार आहेत. गेल्या वर्षी 16 लाख 67 हजार 969 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. यंदा 11 लाख 86 हजार 306 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. गेल्या वर्षी 10 लाख 98 हजार 891 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

Web Title: marathi news CBSE student laptop