चिमुरड़यांनी केक कापून साजरा केला ख्रिसमस

दिनेश चिलप मराठे
सोमवार, 25 डिसेंबर 2017

मुंबादेवी : दादर येथील बालिकाश्रमात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने अनाथ मुलींना सरप्राईज भेट देत अनोखा ख्रिसमस साजरा केला.

 

मुंबादेवी : दादर येथील बालिकाश्रमात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने अनाथ मुलींना सरप्राईज भेट देत अनोखा ख्रिसमस साजरा केला.

 

आपण ज्या प्रमाणे आपल्या कुटुंबासह विविध सण उत्सव आनंदाने साजरे करतो असे आनंदाचे क्षण इतरांच्याही आयुष्यात यावेत आणि ते इतर जर आश्रमातील मुलं असतील तर ते क्षण लाख मोलाचे ठरतात. नेमका हाच विचार मनात बाळगत एक सहृदय माता असलेली सीआयएस एफ फ़ोर्स च्या कमांडेंट ज्या ओएनजीसी येथे कार्यरत आहेत त्यांच्या मनात प्रकटला आणि त्यांनी आपल्या मुलींसह आपण जो आनंद साजरा करतो अगदी तसाच शुद्ध सोन्यासारखा आनंद ज्यांचे कोणीही नाही त्यांच्यासह साजरा करण्याचे ठरविले. 
त्यानुसार आज 25 डिसेंबरला सकाळी 10 वाजता दादर येथील बालिकाश्रमात कमांडेंट शिप्रा श्रीवास्तव यांनी सहका-यांसह भेट देत मायेच्या ममतेने 3 ते 12 वर्ष वयाच्या या आई बाबांना पारख्या झालेल्या मुलींना जवळ घेतले. त्यांची ओळख करुन घेतली. नावे विचारली. मुलींशी भरपूर गप्पा मारल्या. हे सर्व करीत असताना त्याचा उर भरून आला डोळ्यांत अश्रु आले. त्यांच्यासह असलेल्या फ़ोर्स मधील सहका-यांच्या डोळयांच्या कडाही पाणावल्या. शिप्रा त्यांच्यात रमल्या. मुलींना ख्रिसमस ट्री, केक, चॉकलेट्स आणि शालोपयोगी लंच बॉक्स व कंपास बॉक्स या वस्तू भेट दिल्या. त्यांच्यासाठी आणलेला स्पेशल केक मुलींसह कापला आणि प्रभु येशु ख्रिस्ताचा बर्थ डे साजरा केला. 

या मुलींच्या चेह-यावरील आनंदमय हास्यात त्यांनी सामिल होत. मनमुराद दाद देत हॅप्पी ख्रिसमस म्हणत खास शुभेच्छा दिल्या. मुलींना मार्गदर्शन करताना शिप्रा श्रीवास्तव म्हणाल्या की, मी एक महिला असून आज सीआयएसएफच्या कमांडेंट पदावर कार्यरत आहे. आमची यूनिफॉर्म फोर्स आहे. तुम्ही उत्तम शिक्षण घ्या. मेहनतीने अभ्यास करा.माझ्या सारख्या अधिकारी व्हा. मुलींना या जगात आपले मानाचे स्थान निर्माण करण्यासाठी फार कष्ट आणि संघर्ष करावा लागतो. मला खात्री आहे की तुम्ही मोठ्या होऊन एक दिवस आपल्या भारत देशाचे नाव जगात फार मोठे कराल. मनापासून केलेला अभ्यास,खेळ आणि प्रयत्न कधीही वाया जात नाही. त्यामुळे तुम्ही कठोर परिश्रम अंगिकारा नक्की यशस्वी व्हाल.

 

Web Title: Marathi news celebration of Christmas by children