छगन भुजबळ ऑक्‍सिजनवर 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 6 मार्च 2018

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या स्वादुपिंडाला आलेली सूज कमी झाली. मात्र, दम्यामुळे श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने भुजबळ यांना ऑक्‍सिजनवर ठेवण्यात आले आहे. भुजबळ यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या स्वादुपिंडाची सूज कमी झाल्यामुळे त्यांच्या प्रकृतीला धोका नसल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. मात्र, दम्यामुळे त्यांना श्‍वास घेण्यास त्रास होत आहे. त्यांना आणखी काही दिवस डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शनिवारी रात्री पोटात दुखू लागल्यामुळे भुजबळ यांना जे. जे. रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले होते.

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या स्वादुपिंडाला आलेली सूज कमी झाली. मात्र, दम्यामुळे श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने भुजबळ यांना ऑक्‍सिजनवर ठेवण्यात आले आहे. भुजबळ यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या स्वादुपिंडाची सूज कमी झाल्यामुळे त्यांच्या प्रकृतीला धोका नसल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. मात्र, दम्यामुळे त्यांना श्‍वास घेण्यास त्रास होत आहे. त्यांना आणखी काही दिवस डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शनिवारी रात्री पोटात दुखू लागल्यामुळे भुजबळ यांना जे. जे. रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले होते. तपासणी आणि चाचण्यांमध्ये त्यांना पॅनक्रियाटायटीस झाल्याचे, तसेच स्वादुपिंडाच्या जवळची एक नस दबून तिथे रक्ताची गुठळी तयार झाल्याचे स्पष्ट झाले होते. 

Web Title: marathi news Chhagan Bhujbal health

टॅग्स