महिला सहायक आयुक्तांसह लिपिकाला लाच घेताना अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 मार्च 2018

उल्हासनगर - बांधकामधारकाने त्याचे बांधकाम तोडू नये, म्हणून न्यायालयात दाखल केलेल्या स्थगिती आदेशाला सहकार्य करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना उल्हासनगर पालिकेतील विधी विभागाच्या महिला सहायक आयुक्तांसह लिपिकाला अटक करण्यात आली आहे.

छाया डांगळे आणि दीपक मंगतानी अशी त्यांची नावे असून, सापळा रचून त्यांना अटक करण्याची कामगिरी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक वाल्मिक पाटील यांच्या पथकाने केली आहे. तक्रारदाराने त्याच्या प्लॉटमध्ये बांधकाम केलेले आहे. ते पालिकेने तोडू नये, म्हणून त्याने न्यायालयातून स्थगिती आदेश मिळवला होता. तो आदेश आणि तक्रारदार यांच्या बाजूने न्यायालयात खटला दाखल करण्यासाठी छाया डांगळे, दीपक मंगतानी यांनी तक्रारदाराकडे ६० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर ५० हजार रुपयांवर तडजोड होऊन ही रक्कम शुक्रवारी (ता. ९) देण्याचे ठरले होते. याबाबतची माहिती तक्रारदार यांनी ७ तारखेलाच ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती. त्यानुसार आज उपअधीक्षक वाल्मिक पाटील यांनी त्यांच्या पथकासह सापळा रचून सकाळी छाया डांगळे यांना उल्हासनगर पालिकेत आणि दीपक मंगतानी यांना त्यांच्या निवासस्थानी लाच स्वीकारताना अटक केली.

Web Title: marathi news crime bribe ulhasnagar mumbai