डोंबिवली - गुढीपाडव्यानिमित्त जिल्हास्तरीय छायाचित्र स्पर्धा

संजीत वायंगणकर
शुक्रवार, 16 मार्च 2018

डोंबिवली : श्री गणेश मंदिर संस्थान नववर्ष स्वागत यात्रा संयोजन समिती, डोंबिवली आणि सुभेदारवाडा कट्टा, कल्याण यांच्यातर्फे गुढीपाडव्यानिमित्त जिल्हास्तरीय छायाचित्र स्पर्धा भरवण्यात येत आहे.

खुल्या गटासाठी होणाऱ्या या स्पर्धेसाठी गुढीपाडव्यानिमित्त होणारे विविध कार्यक्रम, दीपोत्सव, मुख्य स्वागतयात्रा मिरवणूक व त्यातील सहभागी रथ, पारंपरिक वेशभूषेतील नागरिक, ढोल ताशे तसेच स्वागत यात्रेबरोबरील सेल्फी यापैकी कोणतेही छायाचित्र चालणार आहे.

एका स्पर्धकाला जास्तीत जास्त 10 छायाचित्रे पाठवता येतील. छायाचित्र मूळ असावीत, त्यात कोणतेही संगणकीय वा अॅपद्वारे फेरफार केलेले नसावेत. छायाचित्रे 8" बाय 12" आकारात असावे. छायाचित्र बंद लिफाफ्यात श्री गणेश मंदिराच्या कार्यालयात 22 मार्चपर्यंत जमा करावेत. लिफाफ्यावर आपले संपूर्ण नाव, पत्ता, मोबाइल नंबर याचा उल्लेख असावा. फोटो मागे काहाही लिहू नये. स्पर्धेत सहभागी सर्व छायाचित्रे स्पर्धेदरम्यान व नंतर आयोजकांच्या अधिकारक्षेत्रात असतील व त्याचा वापर करण्यास आयोजकांना कोणत्याही परवानगीची आवश्यकता असणार नाही. निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले जाईल.

Web Title: Marathi news dombifvali news drawing competition