गॅसच्या व्यावसायिक वापराविरोधात मोहीम

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 15 मार्च 2018

मुंबई - घरगुती गॅसच्या व्यावसायिक वापराविरोधात राज्यभर तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना रेशन दुकान तपासणीसोबतच गॅस एजन्सी तपासणी काम देण्यात येणार आहे, असे अन्न आणि नागरीपुरवठामंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

सदस्य वीरेंद्र जगताप यांनी या संदर्भात प्रश्‍न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना बापट म्हणाले की, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांमार्फत जीवनावश्‍यक वस्तू अधिनियमांतर्गत गॅस एजन्सी तपासणीचे काम सुरू आहे. पुरवठा अधिकाऱ्यांकडून स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करतात. आता त्यांना नव्याने गॅस एजन्सी तपासणीचे काम देण्यात येईल. गॅस कंपनींच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ही कारवाई करण्यात येईल. चर्चेत सदस्य सुभाष साबणे यांनी भाग घेतला.

Web Title: marathi news gas businessman campaign