नवी मुंबईत होळी, धूलिवंदनाची धम्माल!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

तुर्भे - नवी मुंबईत गुरुवारी होळी आणि शुक्रवारी धूलिवंदन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. विशेष म्हणजे, या वेळी सुक्‍या रंगाचा अधिक वापर केला जात असल्याचे दिसत होते. यामुळे पाण्याची होणारी नासाडी काही प्रमाणात कमी झाली. 

नवी मुंबईतील स्थानिक आगरी-कोळी समाजाने एक गाव, एक होळी ही प्रथा जपत हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला. प्रत्येक गावात एकाच गावकीच्या मानाच्या होळीची विधिवत व पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते. गावातील महिला पारंपरिक वेषात होळीभोवती फेर धरत गाणी गातात. अशा पद्धतीने नवी मुंबईतील गावांमध्ये होळी उत्साहात साजरी करण्यात आली. 

पाण्याचा सडा टाकून त्यावर आकर्षक रांगोळी रेखाटून सजवलेली होळी. भक्तिभावनेने केलेले तिचे विधिवत पूजन. कापराच्या साह्याने होम पेटवल्यानंतर हातातील डमरू व डफ वाजवत ‘होळी रे होळी, पुरणाची पोळी’, असे ओरडत तिच्याभोवती नाचणाऱ्या बालगोपाळांनी चौकाचौकांत भव्य होळी पेटवल्या. अनेक ठिकाणी होळीभोवती सप्तरंगी रांगोळ्या रेखाटल्या होत्या. हे क्षण मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यात तरुणाई मग्न झाली होती. 

नवी मुंबईत गुरुवारी होळी आणि शुक्रवारी धूलिवंदन उत्साहात साजरे करण्यात आले. शुक्रवारी शाळा-महाविद्यालये बंद असल्याने अनेकांनी गुरुवारीच सहकाऱ्यांना रंगवण्याची संधी साधली. मच्छीमार बांधवांनी पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली. नवी मुंबईत प्लास्टिकबंदी असूनही धूलिवंदनाच्या दिवशी सर्वत्र प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच पडला होता.

Web Title: marathi news holi mumbai dhulivandan

टॅग्स