उल्हासनगरातील कट्टर विरोधक कलानी-बहरानी परिवाराचा पुन्हा घरोबा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

उल्हासनगर : अकरा महिन्यापूर्वी पार पडलेल्या उल्हासनगर पालिका निवडणुकीत टिम ओमी कलानीच्या नावाने रणांगणात उतरणारे आणि भाजपाला महापौर करण्यात मोठा वाटा उचलणारे ओमी कलानी यांनी त्यांच्या टिमच्या पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. त्यात कलानी परिवाराचे कट्टर विरोधक पप्पू बहरानी यांचा टिम मध्ये समावेश करून कलानी-बहरानी परिवारात पुन्हा घरोबा निर्माण केला आहे. यासोबतच शिवसेनेच्या माजी महापौर विद्या निर्मळे, विजय निर्मळे, साई पक्षाचे माजी नगरसेवक डॉ. महेश गावडे आदींसह विविध पक्षातील शेकडो तरुण ओमी टिमच्या गळाला लागले आहेत.

उल्हासनगर : अकरा महिन्यापूर्वी पार पडलेल्या उल्हासनगर पालिका निवडणुकीत टिम ओमी कलानीच्या नावाने रणांगणात उतरणारे आणि भाजपाला महापौर करण्यात मोठा वाटा उचलणारे ओमी कलानी यांनी त्यांच्या टिमच्या पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. त्यात कलानी परिवाराचे कट्टर विरोधक पप्पू बहरानी यांचा टिम मध्ये समावेश करून कलानी-बहरानी परिवारात पुन्हा घरोबा निर्माण केला आहे. यासोबतच शिवसेनेच्या माजी महापौर विद्या निर्मळे, विजय निर्मळे, साई पक्षाचे माजी नगरसेवक डॉ. महेश गावडे आदींसह विविध पक्षातील शेकडो तरुण ओमी टिमच्या गळाला लागले आहेत. त्यांना भाजपच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहेत. ओमीची ही भावी आमदारकीची खेळी मानली जातआहे. 

1986 साली अडीच-अडीच वर्षांचा करार मोडून पाचही वर्ष नगराध्यक्षपद भूषवणारे पप्पू कलानी यांनी काँग्रेसचे जेष्ठ नेते गोप बहरानी यांना नगराध्यक्ष पदापासून वंचित ठेवले होते. तेंव्हा पासून कलानी-बहरानी परिवार एकमेकांचे विरोधक झाले होते. पुढे गोप बहरानी यांचे निधन झाल्यावर त्यांच्या मुलांनीही कलानी परिवाराशी अबोला ठेवला होता. मात्र पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांनी बहरानी पुत्र पप्पू बहरानी यांच्याशी हातमिळवणी करून बहरानी यांना टिम ओमी कलानीच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून कलानी-बहरानी परिवारात पुन्हा घरोबा घडवून आणला आहे.

 उल्हासनगर शहरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यास जोरदार सुरुवात झाली आहे. महापालिकेत भाजप आणि टिम ओमी कलानी एकत्र सत्तेत आहेत, मात्र दोन्ही बाजूंनी आमदारकीच्या तिकिटासाठी आपणच वरचढ कसे आहोत हे दाखविण्यासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. टिम ओमी कलानीने रविवारी सायंकाळी टाऊन हॉलमध्ये विविध पक्षातून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला भाजपच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी, ओमी कलानी, पंचम कलानी, युटीएचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती, मॅन्युफॅक्चयुरिंग असोसिएशनचे पितु राजवानी, भाजपचे महासचिव संजय सिंग, नगरसेवक राजेश वधारिया, हरेश जग्यासी, नगरसेविका रेखा ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. 

टिम ओमी कलानीची कार्यकारणी -
टिम ओमी कलानीच्या अध्यक्षपदी ओमी कलानी, कार्यकारी अध्यक्षपदी संतोष पांडे, दर्शनसिंग खेमानी यांची नेमणूक जाहीर करण्यात आली आहे. उल्हासनगर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष आकाश चक्रवर्ती, युवा अध्यक्ष सागर उंटवाल, अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष पियुष वाघेला, युवा अध्यक्ष रोशन वलेचा, उल्हासनगर युवा अध्यक्ष सुंदर मुदलियार, कार्यकारी अध्यक्ष पंकज त्रिलोकानी, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष सनी तेलकर यासह आदी पदांची घोषणा करण्यात आली. त्यांना नेमणूक पत्र श्वेता शालिनी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
 
दरम्यान टिम ओमीच्या कार्यक्रमातील हाऊसफुल्ल गर्दीने प्रभावित झालेल्या श्वेता शालिनी यांनी उल्हासनगर शहराची अंबरनाथ, कल्याण पूर्व आणि उल्हासनगर अशी तीन विधानसभा मतदारसंघात विभागणी झाली आहे. या तिन्ही विधानसभेवर भाजपाचे कमळ फुलणार असा विश्वास व्यक्त केला.

Web Title: Marathi news kalani and bahrani family comes together again at ulhasnagar