कल्याण ग्रामीण भागात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

संजीत वायंगणकर
गुरुवार, 8 मार्च 2018

पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे सकाळी 9 ते 5 या वेळेत होणाऱ्या मेळाव्या विषयाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळराव लांडगे, उप जिल्हाप्रमुख भरत भोईर, शहरप्रमुख राजेश मोरे, तालुका प्रमुख एकनाथ पाटील, उप तालुकाप्रमुख बंडू पाटील, स्वप्नील मोरे आदी उपस्थित होते.

डोंबिवली : डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील स्था बेरोजगार तरुणांना सहज उपलब्ध अशा  नोकऱ्या ‘आॕन द स्पाॕट’ देणाऱ्या सुमारे ऐंशी नामावंत कंपन्यांच्या सहभागाचा रोजगार मेळावा रविवारी (11) रोजी शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आला आहे.

परिसरातील मोठे उद्योग बंद झाल्याने बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. सरकार दरबारीही नोकऱ्यांची उणीव आहे. काही प्रमाणात ही उणीव भरून काढण्यासाठी  नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन पिंपळेश्वर माहादेव मंदिर प्रांगणात  केले आहे. या मेळाव्यात पाच हजार बेरोजगारांना रोजगार मिळणार असून शिवसेना डोंबिवली शहर शाखा आणि कल्याण ग्रामीण विधान सभा पदाधिकारी, नगरसेवक, युवासेना, महिला आघाडी व शिवसैनिक रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी झटत आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत रमेश म्हात्रे यांनी दिली.

पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे सकाळी 9 ते 5 या वेळेत होणाऱ्या मेळाव्या विषयाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळराव लांडगे, उप जिल्हाप्रमुख भरत भोईर, शहरप्रमुख राजेश मोरे, तालुका प्रमुख एकनाथ पाटील, उप तालुकाप्रमुख बंडू पाटील, स्वप्नील मोरे आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देताना रमेश म्हात्रे म्हणाले, सुमारे 80 पेक्षा जास्त नामांकित कंपन्यांमध्ये मेळाव्यात तात्काळ नोकरी मिळणार आहे. विशेष म्हणजे नोकरीसाठी कोणत्याही प्रकारचा मोबदला द्यावा लागणार नाही. मेळाव्यात अशिक्षित, दहावी पास-नापास, पदवीधर, उच्च पदवीधर शैक्षणिक पात्रता असणाऱ्यांना हमखास नोकरी मिळणार आहे. परंतु उमेदवाराने मेळाव्यात येताना आपले 3 फोटो, परिचय पत्र, शैक्षणिक पात्रता, आदी बाबत मूळ कागदपत्रे बरोबर आणावे, असेही म्हात्रे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, या विभागाचा विचार केला तर सुमारे 60 टक्के लोकं बेरोजगार असून हा मोठा गहन प्रश्न आहे. पूर्वी कल्याण-डोंबिवली विभागात मोठ्या प्रमाणात कंपन्या होत्या. त्यामुळे नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होत असत. मात्र आता औद्योगिक विभागातील कंपन्या बंद पडल्या असल्याने नोकऱ्यांचा प्रश्न जटील झाला आहे. तर गोपाळराव लांडगे म्हणाले,  नोकर भरतीची पद्धत बदल्यामुळेव सरकारी रिक्तजागा भरल्या जात नाहीत त्यामुळे बेरोजगारांचे प्रमाण वाढले आहे. मेळाव्यात येऊन तरूण मंडळींनी लाभ घ्यावा, असेही आवाहन लांडगे यांनी केले.

Web Title: Marathi news Kalyan news employment