कामात सुधारणा न झाल्यास केडीएमटीचे खासगीकरण करू - राहुल दामले 

रविंद्र खरात 
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

कल्याण : एवढ्या वर्ष परिवहन सदस्य पोटतिडकीने विषय मांडतात, पण काय उपयोग, परिवहनच्या कारभारात अनेक कर्मचारी संघटनेचा हस्तक्षेप वाढला असून तो थांबला पाहिजे, उत्पन्न वाढीसाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने मेहनत केली पाहिजे तसे होत नसेल तर पालिकेकडून अनुदान का द्यावे, परिवहन उपक्रमाच्या कारभारात सुधारणा न झाल्यास पालिकेकडून अनुदान बंद करून खासगीकरणाचा विचार करू असा सज्जड दम पालिका स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी आज बुधवारी (ता. 7) झालेल्या परिवहन समितीच्या सभेत अधिकारी वर्गाला दिला. 

कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समितीची सभा आज बुधवारी (ता. 7) फेब्रुवारी रोजी पालिका मुख्यालयात पार पडली. कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमात खासगी ठेकेदार मार्फत कंत्राटी वाहक, चालक, सफाई कामगार, कार्यशाळेत कारागिर यांची भरती करण्याच्या विषयात परिवहन समिती सदस्यांनी प्रशासनावर भडीमार केले असता उत्तर देण्यास अधिकारी वर्ग असमर्थ ठरले तर यावेळी परिवहनमध्ये सुधारणा करणे अशक्य असल्याचे मत पालिका उपायुक्त आणि प्रभारी केडीएमटी महाव्यवस्थापक सुरेश पवार यांनी उच्चार केल्याने स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी संताप व्यक्त केला. 

दिवसेंदिवस सर्व पक्षीय कर्मचारी संघटनाचा हस्तक्षेप वाढला असून त्यामुळे उपन्न ही घटत आहे. पालिकेने किती दिवस अनुदान द्यायाचे असा सवाल करत, शासनाकडून आलेले अधिकारी येतील जातील मात्र येथील अधिकारी कर्मचारी कधी जवाबदारी घेणार की नाही, मी स्थायी समिती सभापती पदावर असे पर्यंत खपवून घेणार नाही, सुधारणा न झाल्यास अनुदान थांबवून केडीएमटी खासगीकरण करू असा सज्जड दम दिला तर संघटनेचा हस्तक्षेप थांबविण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना साकडे घाला असा सल्ला ही यावेळी दामले यांनी परिवहन समिती सदस्यांना दिला. 

शारीरिक दृष्ट्या 40 टक्के अपंग असलेल्या सर्व दिव्यांगसाठी केडीएमटी मोफत बससेवा सुरू करावे अशी मागणी सदस्य संतोष चव्हाण यांनी करत पालिकेने अनुदान देण्याची मागणी केली, तर मोफत पास देण्यासाठी सदस्य मनोज चौधरी यांनी केली असता, शालेय विद्यार्थ्यांना बस मधून मोफत प्रवास करण्याची मागणी सभापती संजय पावशे यांनी केली तर सदस्य आणि नगरसेवक नितीन पाटील यांनी हा प्रस्ताव मंजूर करावा मात्र एकीकडे केडीएमटी डबघाईला आली असताना जो आर्थिक बोजा कसा दूर करणार यावर प्रशासन काय करणार यावर सविस्तर माहिती देण्याची मागणी केली तर, स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी सदस्यांचे अस्थायी प्रस्ताव असले तरी त्याची अंमलबजावणी करावी अश्या सूचना दिल्या तर सदस्यांच्या चर्चा पाहता पालिका उपायुक्त आणि केडीएमटी प्रभारी महाव्यवस्थापक सुरेश पवार यांनी अन्य परिवहन सेवा काय करते आणि शासनाने काय आदेश दिले आहेत याचा सर्व अभ्यास करून धोरणात्मक निर्णय आणि प्रस्ताव आणू असे आश्वासन दिल्याने लवकरच या सुविधा मिळणार आहेत.

Web Title: Marathi news kalyan news KDMT privatization progress