अनुसूचित जातीजमाती आयोगाच्या अध्यक्षांचा आजपासून महाराष्ट्र दौरा 

रविंद्र खरात
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

कल्याण : 3 जानेवारीला रोजी झालेल्या महाराष्ट्र बंदच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणानंतर पोलिसांनी अटकसत्र सुरू केल्यानंतर अनेक शहरातून आमच्यावर अन्याय झाल्याच्या तक्रारी पाहता राज्य शासनाच्या आदेशानुसार आज पासून महाराष्ट्र दौरा सुरू केला असून प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधून प्रत्यक्ष घटना, पोलिसांची कारवाई, नागरीकांचे म्हणणे ऐकून घेत असून त्याचा समग्र अहवाल महिनाभरात राज्यशासनाला सादर करणार असल्याची माहिती राज्याचे अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती सी. एल. थुल यांनी दिली. 

भिमा कोरेगाव येथे 1 जानेवारीला झालेल्या दंगलीचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रात उमटले. यावेळी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, राज्यात बंद होता, यावेळी कल्याण सहित औरंगाबाद, पुणे, नाशिक, नगर, भिमा कोरेगाव, वडू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. यात कल्याणमध्ये सिद्धार्थ नगर मधील दलित वस्तीवर भ्याड हल्ला आणि पोस्टर फाडणे, महिलांना मारहाण, जय भीम स्तंभाची तोडफोड तर दुसरीकडे, चिंचपाडा परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. यात अनेकांवर गुन्हे दाखल केल्यानंतर पोलिसांनी धरपकड केल्यानंतर निष्पाप लोकांवर गुन्हे दाखल करून अटक करत असल्याचा तक्रारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. त्यामुळे राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने राज्याचे अनुसूचित जाती जमाती आयोग्याला याप्रकरणात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या धर्तीवर आयोगाचे अध्यक्ष व माजी न्यायमूर्ती सी. एल. थुल आणि सदस्यांनी कल्याणमध्ये आज सोमवारी (ता. 5) सकाळी 11 वाजता कल्याण पूर्व मधील सिद्धार्थनगर मधून पाहणी दौरा केला.

यावेळी पोलीस उपायुक्त संजय शिंदे , तहसीलदार अमित सानप, एसीपी दत्तात्रय कांबळे, दलित मित्र अण्णा रोकडे, उदय रसाळ, मिलिंद बेळमकर आदी सहभागी होते. यावेळी कल्याण पूर्व सिद्धार्थ नगर, चिंचपाडा, कोळशेवाडी पोलीस ठाणे, आदी परिसरात पाहणी केली. तद्नंतर कल्याण पश्चिम मधील शासकीय विश्रामगृहात अन्यायग्रस्त नागरीकाच्या म्हणणे नोंदणी करण्यात आले. 

तद्नंतर पत्रकारांशी बोलताना राज्याचे अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती सी. एल. थुल यांनी म्हणाले की, भिमा कोरेगाव मधील घटनेच्या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री यांनी जाहीर केले आहे. तो अहवाल समोर येईलच, मात्र 3 तारखेच्या हिंसाचार आणि दंगलीत सवर्ण विरुद्ध दलित असे वळण देण्यात आले, दोन्ही समाजाच्या अन्याय झाल्याच्या तक्रारी पाहता, सामाजिक न्याय विभागाने दिलेल्या सूचनेनुसार आज पासून महाराष्ट्रभर दौरा करणार आहोत. आज कल्याण उद्या पुणे, नगर, औरंगाबाद, नाशिक, भिमा कोरेगाव, वडू, आदी शहरात पाहणी करून नागरिकांना भेटणार असल्याचे सांगत माजी न्यायमूर्ती आणि आयोग अध्यक्ष सी. एल. थुल पुढे म्हणाले की, महाराष्ट्र बंदच्या दरम्यान अनेक ठिकाणी वाहनांची तोडफोड, जाळपोळ, मारहाण आदी शहरात भेटी देणार आहोत. प्रत्यक्ष घटनास्थळी भेटी देणार असून पोलिसांचा तपास, चौकशी आणि नागरिकांचे म्हणणे असा एकत्र अहवाल बनवून शासनाला एक महिन्यात सादर करणार असून यात शासकीय, निम शासकीय, खासगी नोकर वर्ग, विद्यार्थी यांच्यावर अन्याय होणार नाही यासाठी प्रयत्न करू असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Marathi news kalyan news maharashtra c l thul