कल्याण पूर्वमधील परीसर कचरामुक्त करा - मनविसेची मागणी  

रविंद्र खरात
सोमवार, 15 जानेवारी 2018

कल्याण : कल्याण पूर्व मधील साकेत कॉलेज परिसरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून विद्यार्थ्यांसमवेत नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असून तेथील कचरा त्वरीत साफ करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कल्याण शहर शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. 

कल्याण पूर्व मधील पालिकेच्या ड प्रभाग क्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कल्याण पूर्व मधील साकेत कॉलेज परिसरात अनेक दिवसापासून कचरा न उचलल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, त्यामुळे कॉलेज मधील विद्यार्थी आणि परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत आज सोमवारी (ता. 15) महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कल्याण शहर शाखेचे उपशहर अध्यक्ष अंकुश राजपूत, योगेश गव्हाणे, भुषण लांडे, प्रणव देसाई, मनिष यादव, मयुरेष बडगुजर, सुनिल जाधव, कुणाल क्षेत्रे आदींच्या शिष्टमंडळाने कल्याण पूर्व मधील पालिका ड प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि घनकचरा विभागाच्या अधिकारी वर्गाला निवेदन देऊन समस्या मांडली. यावेळी अधिकारी वर्गाने त्वरीत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार आज अधिकारी वर्गाची भेट घेत कचरा समस्या मांडली, अधिकारी वर्गाने ही आश्वासन दिले, मात्र त्या परीसरात स्वच्छता होते का नाही ते पाहू अन्यथा मनसे स्टाईलने समाचार घेऊ असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना उपशहर अध्यक्ष अंकुश राजपूत यांनी पालिकेला दिला आहे. 

Web Title: Marathi news kalyan news mns demand for clean kalyan