कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना अधिकाऱ्यांचा वरदहस्त - दार हळबे

सुचिता करमरकर
शुक्रवार, 9 मार्च 2018

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना पालिकेतील अधिकाऱ्यांचा वरदहस्त लाभतो असा आरोप करत पालिकेतील विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी राज्य सरकारकडे धाव घेतली होती. यावर त्वरित कारवाई करत सरकारने संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करुन दहा दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पालिका आयुक्त पी वेलारसू यांनी ही चौकशी करायची आहे. 

पालिका अतिरिक्त आयुक्त संजय घरत, अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त सुरेश पवार तसेच प्रभाग अधिकारी भागातील भांगरे यांच्या संगनमताने अनधिकृत बांधकामे होत असल्याचा आरोप हळबे यांनी केला होता. या संदर्भात त्यांनी नगर विकास विभाग, राज्याचे मुख्य सचिव तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. आज याला उत्तर देताना सरकारने तिघांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दहा दिवसांत विशेष दुतामार्फत हा चौकशी अहवाल सरकारला सादर करायचा आहे. 

Web Title: Marathi news kalyan news municipal corporation illegal construction