नो पार्किंग झोनमध्ये रिक्षा लावण्यास विरोध केल्याने महिला पोलिसाला मारहाण 

रविंद्र खरात
बुधवार, 7 मार्च 2018

कल्याण : जागतिक महिला दिनाच्या एक दिवस अगोदर कल्याण पश्चिम मध्ये रेल्वे स्थानक परिसरात नो पार्किंग झोन मध्ये रिक्षा पार्क करण्यास विरोध करणाऱ्या रेल्वे सुरक्षा बलाच्या महिला कर्मचारीला धक्काबुकी केल्याने पुन्हा एकदा रिक्षा चालक यांची दादागिरी आणि मुजोरपणा समोर आला असून जागतिक महिला दिन एक दिवसापूर्वी या घटनेमुळे खरच महिला सुरक्षित आहेत का असा सवाल केला जात आहे. 

कल्याण : जागतिक महिला दिनाच्या एक दिवस अगोदर कल्याण पश्चिम मध्ये रेल्वे स्थानक परिसरात नो पार्किंग झोन मध्ये रिक्षा पार्क करण्यास विरोध करणाऱ्या रेल्वे सुरक्षा बलाच्या महिला कर्मचारीला धक्काबुकी केल्याने पुन्हा एकदा रिक्षा चालक यांची दादागिरी आणि मुजोरपणा समोर आला असून जागतिक महिला दिन एक दिवसापूर्वी या घटनेमुळे खरच महिला सुरक्षित आहेत का असा सवाल केला जात आहे. 

कल्याण रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित माने यांनी दिलेल्या माहिती नुसार कल्याण पश्चिम  रेल्वे स्थानक मध्ये कसाराच्या दिशेने असलेल्या सरकता जिना जवळ कल्याण रेल्वे सुरक्षा बलाचा कडेकोट बंदोबस्त असतो. त्याच्या बाजूला रेल्वे प्रवासी यांच्या वाहनाना जाणारा मार्ग असून तेथे रिक्षा आणि अन्य वाहनांना नो पार्किंग आणि नो एन्ट्री झोन आहे . त्या परिसरात आज (ता. 7) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास काही रिक्षा चालकांनी तेथे रिक्षा पार्क करून प्रवासी उतरवीत होते, तेथे ड्युटीवर असलेल्या कल्याण रेल्वे सुरक्षा बलाच्या निलम गुप्ता या महिला कर्मचारी होत्या. त्यांनी त्या रिक्षा वाल्याना हटकले येथे रिक्षा पार्क करू नका, आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश आहेत. असे म्हणत महिला कर्मचारी निलम गुप्ता या रिक्षा काढण्यास सांगत तेथून निघून जात आपल्या जागेवर गेल्या मात्र रिक्षा चालक काही थांबेना आणि मोठ्या मोठ्याने बोलत विरोध करत होते, यामुळे पुन्हा सुरक्षा बलाच्या महिला कर्मचारी नीलम गुप्ता यांनी तेथून जाण्यास सांगितले मात्र ते रिक्षा चालक तेथून न जाता, त्या महिला कर्मचारी जवळ जाऊन वाद करू लागले हा वाद शिगेला पोहचला.

या दरम्यान त्या रिक्षा चालकांनी त्या महिला कर्मचारीला धक्काबुक्की केली, यामुळे काही काळ तणाव होता. धक्काबुक्की करणाऱ्या दोन रिक्षा चालकांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणि  धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना नंतर जामीनवर सोडण्यात आल्याची माहिती  रेल्वे सुरक्षा बलाने दिली. मात्र जागतिक महिला दिनाच्या एक दिवस अगोदर महिला कर्मचाऱ्याला धक्काबुक्की प्रकरणमुळे रिक्षा चालकाविरोधात चांगलेच संतापाचे वातावरण होते. 

सुरक्षा बलाने दोन रिक्षा चालकांना ताब्यात घेतल्याने रिक्षा चालकांनी कल्याण मधून उल्हासनगर, वालधुनी आणि खडकपाडा अन्य ठिकाणी जाणाऱ्या रिक्षा बंद केल्या, तब्बल एक ते दीड तास रिक्षा बंद केल्याने नागरीकांना चांगलाच त्रास झाला. याची माहिती मिळताच महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तेथे बंदोबस्त वाढविला तर प्रवाश्यांना त्रास होऊ नये म्हणून कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांनी घटना स्थळी धाव घेऊन नागरीकांना मदत करत होते . घटनेची माहिती मिळताच रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी रिक्षा चालकांना रिक्षा सुरू करण्यास सांगत कल्याण रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यलयात जाऊन घटनेची माहिती घेतली.

ही घटना गैरसमजातून झाली असून याबाबत कल्याण रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात जाऊन माहिती घेतली अशी प्रतिक्रिया रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी दिली मात्र अधिक बोलण्यास नकार दिला.

वरिष्ठ अधिकारी वर्गाने मला ड्युटी दिली त्याची अंमलबजावणी करत होते, वाद झाल्यावर मी वरिष्ठ अधिकारी कडे जा असे म्हणत होते, माझ्या अंगावर वर्दी असताना मला धक्काबुक्की केली हे चुकीचे आहे त्यांना कुठलीही धाक नाही, महिला कर्मचारी ही बघत नाही ही शोकांतिका आहे अशी प्रतिक्रिया कल्याण रेल्वे सुरक्षा बलाच्या महिला कर्मचारी निलम गुप्ता यांनी दिली.

Web Title: Marathi news kalyan news railway police no parking auto rickshaw