कल्याणमध्ये राम गणेश गडकरी कट्ट्याचे उद्घाटन

सुचिता करमरकर
बुधवार, 17 जानेवारी 2018

कल्याण : पुणे शहरातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा बालगंधर्व रंगमंदिर किंवा शहरातील अन्य योग्य अशा ठिकाणी पुर्नस्थापित करावा अशी मागणी राम गणेश गडकरी कट्ट्यातर्फे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना देण्यात आले आहे. पत्रकार तुषार राजे, नाट्यप्रेमी मेघन गुप्ते यांच्यासह काही गडकरीप्रेमींनी हे निवेदन दिले आहे. 23 जानेवारी 2018 पासून सुरु होत असलेल्या गडकरी स्मृती शताब्दी वर्षानिमित्त कल्याण शहरात त्यांच्या नावाने कट्टा सुरु करण्यात येत आहे. 

वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी 23 जानेवारी 1919 ला राम गणेश गडकरी यांचे निधन झाले. गडकरी स्मृती शताब्दी वर्षाच्या प्रारंभाच्या निमित्त्याने कट्टा तसेच वर्षभराच्या विविध उपक्रमांची माहिती तुषार राजे यांनी दिली. 22 जानेवारी रोजी स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात एक कार्यक्रम होत आहे. 23 जानेवारी रोजी सकाळी गुजराथमधील नवसारी येथे एक कार्यक्रम होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी कल्याणात कट्ट्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान या निमित्ताने ठाण्याच्या डॉ. विमुक्ता राजे तसेच निवेदिका अनुश्री फडणीस राम गणेश गडकरी यांच्या कविता तसेच साहित्याचे वाचन करणार आहेत. प्रसिध्द कलाकार संकर्षण कऱ्हाडे या कार्यक्रमास हजेरी लावणार आहे. 

संभाजी पार्कमधुन काढून टाकण्यात आलेला गडकरी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. मात्र काही कलाकारांनी पालिकेला गडकरी यांचा पुतळा भेट दिला होता. हा पुतळा सध्या पुण्याच्या महापौर दालनात ठेवण्यात आला आहे. हा पुतळा बालगंधर्व रंगमंदिरात बसवला जावा अशी मागणी कट्ट्याच्या वतीने महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे केली आहे. बालगंधर्वांच्या पडत्या काळात गडकरी यांच्या लेखणीने त्यांना अनमोल अशी साथ दिली. एकच प्याला या गडकरी यांच्या अजरामर नाटकाने बालगंधर्व यांची कंपनी पुनर्जीवित झाली. त्यांच्यातील या नात्याला स्मरुन हा पुतळा बालगंधर्व रंगमंदिरात बसवला जावा अशी मागणी करण्यात आली आहे. जर रंगमंदिरात शक्य नसेल तर शहरात अन्यत्र तो उभारला जावा असा पर्यायही देण्यात आला आहे. 

कट्ट्याच्या माध्यमातून प्रत्येक महिन्यात एक कार्यक्रम आयोजित केला जाईल. वर्षभर राज्यस्तरावर एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येतील. या उपक्रमात त्यांना कल्याण डोंबिवली महापालिकेची साथ लाभणार आहे. कट्ट्याच्या कामात नरेंद्र राजे, अरविंद तरफदे, पुरुषोत्तम फडणीस यांचाही सहभाग असेल. 

Web Title: Marathi news kalyan news ram ganesh gadkari katta inauguration