कल्याणमध्ये क्रिडा महोत्सव संपन्न

Kalyan-sports
Kalyan-sports

कल्याण : कल्याण मधील "रौनक सिटी सेक्टर 3" येथे 'वार्षिक क्रीडा महोत्सव 2017' हा रविवार ता 24 डिसेंबर आणि सोमवारी (ता. 25) आयोजित करण्यात आला होता. त्यात 284 खेळाडूंनी सहभाग घेतला तर या क्रिडा महोत्सवात फुटबॉल टूर्नामेंट, क्रिकेट टूर्नामेंट, रस्सीखेच टूर्नामेंट, रिले रेस, 100 आणि 200 मीटर रनिंग, स्लो साइकिलिंगसह इंडोर प्रकारात बॅडमिंटन, कॅरम, टेबल टेनिस तसेच लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. 

एखाद्या गृहसंकुलात एवढ्या मोठ्या प्रमाणात क्रीडामहोत्सव आयोजित केल्याची ही पहिलीच घटना आहे. विशेष म्हणजे हे आयोजन कोणत्याही राजकीय पक्ष किंवा व्यक्तीने किंवा समूहाने आयोजित केलेला नसून स्थानिक रहिवाशांच्या पुढाकाराने लोकांमध्ये खेळभावना वाढीस लागावी, लोकांना खेळाचे जीवनातील महत्व समजावे व आरोग्यसंपन्न जीवन जगावे या साठी हे आयोजन करण्यात आलेले होते. "स्मार्ट नागरिकच स्मार्टसिटी ची उभारणी करतात" ह्याचा प्रत्यय ह्या आयोजनाने पुढे आलेला आहे. ह्या महोत्सवात पुढील खेळाडूंनी प्रावीण्य प्राप्त केले. 


पुरुष बैडमिंटन
राजेंद्र मार्के - सुवर्णपदक
शिवराज पवार- रजतपदक 

महिला बैडमिंटन
कविता गायकवाड - सुवर्णपदक
श्वेताली वाघ- रजतपदक

पुरुष टेबल टेनिस
नामदेव वाकर - सुवर्णपदक 
जयेश बजाज- रजतपदक

महिला टेबल टेनिस
मनाली चव्हाण - सुवर्णपदक
नम्रता वाकर - रजतपदक

कॅरम पुरुष
प्रवीण कसारे - सुवर्णपदक
नामदेव वाकर- रजतपदक

कॅरम महिला 
अवंतिका महाबळे - सुवर्णपदक
प्रतिभा किशोर - रजतपदक

100 मीटर धावणे पुरुष
अनुराग जीरे - सुवर्णपदक
रामाशीष यादव- रजतपदक

महिला 100 मीटर धावणे
अनघा करकरे - सुवर्णपदक
सलोरा पंडा- रजतपदक

200  मीटर धावणे महिला 
अनघा करकरे - सुवर्णपदक
नीता माने - रजतपदक

स्लो सायकलिंग  
अरविंद पांडे - सुवर्णपदक
अजिंक्य सेठ - रजतपदक 


सांघिक खेळात बॉक्स क्रिकेट पुरुष- सी 7 संघ विजेता/सी 4 संघ उपविजेता बॉक्स क्रिकेट महिला-सी 7 संघ विजेता/सी 16 संघ उपविजेता फुटबॉल-सी 1 संघ विजेता/ सी 15 संघ उपविजेता, रस्सीखेच स्पर्धा सी 13 संघ विजेता/सी 16 संघ उपविजेता, रिले पुरुष- सी 6 संघ विजेता/ सी 7 संघ उपविजेता ठरले.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com