कल्याण-डोंबिवलीकरांना धुलिकणांमूळे होणाऱ्या आजाराचा विषय विधान परिषदेत

सुचिता करमरकर
शुक्रवार, 9 मार्च 2018

कल्याण : कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना धुलिकणांमूळे होणाऱ्या आजाराचा विषय आज विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला. आमदार जगन्नाथ शिंदे यांनी हा विषय सभागृहात मांडला. लवकरच शहरातील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची पाहणी करण्याचे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी यावरील चर्चेनंतर दिले आहे. 

धुलिकणांमूळे शहरातील नागरिकांना घशाच्या आजरांना सामोरे जावे लागत असल्याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. या प्रश्नावर पालिका अधिकाऱ्यांनी दिलेले उत्तर  सभागृहाची दिशाभूल करणारे आणि मूळ विषयाला बगल देणारे असल्याचे आमदार शिंदे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी सांगितले की,  या शहरांत सुरु असणाऱ्या कामांची शासनस्तरावर पाहणी करण्यात येईल. तसेच महापालिकेचा एकंदरीत भोंगळ कारभार पाहता याप्रश्नी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक लावण्याचे निर्देशही सभापतींनी दिले आहेत. 

पालिका प्रशासनाचा दावा
श्वसन विकारांवरील औषध उपचारांसाठी नागरिकांना डॉक्टरांकडे वरचेवर खेटे घालावे लागतात. मात्र  पालिका प्रशासनाने असे रुग्ण वाढलेलेच नसल्याचा दावा केला आहे. घशाचे विकार, खोकला होण्यामागे वातावरणातील बदल आणि हवेतील कोरडेपणा कारणीभूत असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच शहरात अत्यंत कमी ठिकाणी सिमेंट काँक्रीटची कामे सुरु असून त्यामूळे हवेतील धूलिकण वाढले नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. 

Web Title: Marathi news kalyan news vidhan parishad citizens