कल्याण रेल्वे प्रवासी संघटनांची व्यवस्थापनावर नाराजी

रविंद्र खरात 
सोमवार, 29 जानेवारी 2018

कल्याण - कल्याण ते इगतपुरी दरम्यान मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा हे रविवार ता 4 फेब्रुवारी 2018 ला पाहणी दौरा करणार असून या दौऱ्यात काही प्रवासी संघटनांनाही ते भेटणार आहेत. मात्र त्यांचा संघटनांना दिलेला वेळ पाहता समस्या काही मांडता न येणार नसल्याने कल्याण कसारा कर्जत प्रवासी संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या बैठकीवर बहिष्कार घालीत निषेध व्यक्त केला आहे. 

कल्याण ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान 10 लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात, मात्र अनेक प्रकल्प रखडलेल्याने सर्वसामान्य प्रवाश्याला त्रास होत आहे. या मार्गावर दुहेरी मार्ग असून मेल गाड्या पुढे काढत असल्याने सकाळी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना प्रति दिन मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

कल्याण ते कसारा तिसरी मार्गिका व कल्याण ते आसनगाव चौथी मार्गिका मार्च 2020 च्या आत पुर्ण करणे, आसनगाव येथे होमफलाट ऑगस्ट 2018 पर्यंत पुर्ण करणे, कल्याण यार्ड विस्ताराचे काम जून 2019 पर्यंत पुर्ण करणे तर आणि तरच काही बदल जाणवेल व हे महत्त्वकांक्षी प्रकल्प पुर्ण होत नाही तोपर्यंत टिटवाळा कसारा वा कल्याण-नाशिक सेवा किमान दिवसातून 4 फेऱ्या चालविणे अश्या मागण्या कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना करत आहेत. मात्र रेल्वे प्रशासन दुर्लक्षं करत आहेत. रेल्वे अधिकारी प्रवासी संघटनांना गोंजारण्याचे काम करायचे, निवेदनं घ्यायची मात्र त्यांची पाठ फिरताच केराची टोपली दाखवायची, ही आडमुठ्ठेपणा जोपर्यंत आहे. तोपर्यंत आपल्या मार्गावरील प्रवाशांचा वनवास संपणार नाही, ही आमची धारणा आहे. त्यामुळे स्वतंत्र वेळ देऊन या समस्यांवर काही निवेदन आम्हा रेल्वे प्रवाशांसमोर करुन या विषयावर निश्चित भुमिका जाहीर करणार नसाल आणि तर केवळ 10 ते 15 मिनिट केवळ समस्यांचं निवेदन स्विकारणार असाल तर आम्ही या बैठकीवर बहिष्कार टाकून या प्रवृत्तीचा निषेध व्यक्त करणार आहोत, असे संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी जाहीर केलेय. यामुळे रेल्वे प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्षं लागले आहे.

Web Title: marathi news kalyan railway passenger union