कल्याण रेल्वे स्थानकाचा लूक लवकरच बदलणार 

रविंद्र खरात 
सोमवार, 29 जानेवारी 2018

कल्याण - रेल्वे प्रवाशांना कल्याण रेल्वे स्थानकातून सुखकर आणि सुरक्षित प्रवास करण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध उपाययोजना करत असून पहिल्या टप्यात रेल्वे स्थानकातील कॅन्टीन आणि कार्यालय स्टेशन बाहेर हलविण्यात येणार असून प्रवाशांचे मन प्रसन्न राहावे, यासाठी स्टेशनात रंगरंगोटी आणि विविध चित्र काढण्याचे काम सुरु झाल्याने लवकरच कल्याण रेल्वे स्थानकाचे लूक बदलणार आहे.

कल्याण - रेल्वे प्रवाशांना कल्याण रेल्वे स्थानकातून सुखकर आणि सुरक्षित प्रवास करण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध उपाययोजना करत असून पहिल्या टप्यात रेल्वे स्थानकातील कॅन्टीन आणि कार्यालय स्टेशन बाहेर हलविण्यात येणार असून प्रवाशांचे मन प्रसन्न राहावे, यासाठी स्टेशनात रंगरंगोटी आणि विविध चित्र काढण्याचे काम सुरु झाल्याने लवकरच कल्याण रेल्वे स्थानकाचे लूक बदलणार आहे.

मुंबई मधील एल्फिस्टन रेल्वे स्थानकातील दुर्घटनानंतर मध्य रेल्वेच्या अनेक रेल्वे स्थानकावरील सुरक्षा बाबत उपाय योजना सुरु आहे. कल्याण रेल्वे स्थानकात एकूण 7 प्लॅटफार्म असन प्रत्येक 3 मिनिटाला लोकल किंवा मेल गाडी दाखल होते, प्रति महीना 58 लाख प्रवासी प्रवास करतात. प्रत्येक फलाटावर कॅन्टीन असून 4 आणि 5 नंबर फलाटावर काही कार्यालय आहेत. यामुळे मेल अथवा लोकल गाडी आल्यावर जागा कमी असल्याने प्रवाशांची घुसमट होते. यावर कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनाने रेल्वे स्थानकातील शेड दुरुस्ती, फलाट उंची, कार्यालय हटविणे, पुलाची दुरुस्ती, रेल्वे पोलिस ठाणे दुरुस्ती, कॅन्टीन हलविणे आदी मागण्या रेल्वे प्रशासनाला केली होती. या धर्तीवर रेल्वे प्रशासनाने ठोस पाऊले उचलण्यास सुरवात केल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 

कल्याण रेल्वे स्थानकाचे लूक बदलणार
कल्याण रेल्वे स्थानकातून प्रवास करताना प्रवाशांचे मन प्रसन्न रहावे यासाठी रेल्वे स्थानकात रंगरंगोटी सुरु असून रेल्वे स्कूलमधील विद्यार्थी दिवस रात्र मेहनत करत रेल्वे स्थानकाच्या विविध ठिकाणी चित्र काढत असून स्वच्छता, पर्यावरण आणि सुरक्षा बाबत प्रबोधन करणारे चित्र काढत आहेत. तर रेल्वे स्थानकातील धोकादायक शेडचे पत्रे बदलण्याचे काम सुरु असून लवकरच रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कॅन्टीन आणि कार्यालय हलविणार असल्याची माहिती रेल्वेच्या सुत्रांनी दिली असून लवकरच रेल्वे स्थानकाचे लूक बदलणार असून यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

रेल्वे प्रवाशांना रेल्वे स्थानकातून प्रवास करताना सुखकर, सुरक्षित आणि मन प्रसन्नता वाटावे यासाठी विविध उपाययोजना सुरु असून प्रवाशांनी स्वच्छता पासून सर्वच कामात प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन कल्याण रेल्वे स्टेशन मास्तर प्रदीपकुमार दास यांनी केले आहे. 

 

Web Title: marathi news kalyan railway platform look