'मोजोस'च्या मालकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जानेवारी 2018

मुंबई : कमला मिल कम्पाऊंडमधील दुर्घटनेप्रकरणी शनिवारी (ता. 6) पोलिसांनी मोजोस बिस्ट्रोच्याही मालकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. महापालिकेच्या अहवालानंतर पोलिसांनी सायंकाळी मोजोसचा मालक युग पाठक याला अटक केली. 

कमला मिल कम्पाऊंडमधील मोजोस आणि वन अबोव्ह पबमध्ये आगीची दुर्घटना घडली होती. यात 14 जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी वन अबोव्हच्या मालक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

त्यानंतर वन अबोव्हचे मालक फरारी होते. त्यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या दोघांना भायखळा पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी (ता. 5) महापालिकेने दुर्घटनेसंदर्भात सविस्तर अहवाल सादर केला. मोजोसच्या दक्षिण पूर्वेकडील भागात पडद्यांनी पेट घेतला. त्यानंतर आग छतापर्यंत गेल्याचा निष्कर्ष या अहवालात आहे.

पबमधील ग्राहक, सुरक्षा रक्षक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहिती आणि व्हिडीओच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. तपासादरम्यान शनिवारी पोलिसांनी मोजोसचा मालक युग पाठक आणि युग तुली याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. पाठक हा माजी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा आहे. पाठकला सायंकाळी पोलिसांनी अटक केली. त्याला रविवारी (ता. 7) न्यायालयात हजर केले जाणार आहे. तुली फरारी असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: marathi news Kamla Mill Fire Mumbai Police