मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात भारिप करणार मुंडन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

कर्जत - कोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराच्या प्रकरणात भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे यांना अद्याप अटक केली नसल्याच्या निषेधार्थ कर्जत भारिपतर्फे शनिवारी (ता. 3) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कर्जत दौऱ्यादरम्यान सामूहिक मुंडन केले जाणार आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचाराच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये कुठलीही हिंसा झालेली नसताना पोलिसांनी आंदोलकांवर गंभीर गुन्हे दाखल करून अटक केल्याचा आरोपही भारिपने केला आहे. त्याचाही निषेध केला जाणार आहे, असे निवेदन भारिपने तहसीलदार अविनाश कोष्टी यांना ेदिले आहे.
Web Title: marathi news karjat news mumbai news chief minister tour bharip mundan