जव्हार, डहाणू नगरपरिषदेचे उद्या मतदान, यंत्रणा सज्ज

भगवान खैरनार
शनिवार, 16 डिसेंबर 2017

मोखाडा : पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि डहाणू नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान उद्या (रविवार) होणार आहे. उमेदवारांनी उडवलेला प्रचार आज थंडावत आहे. मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.     

जव्हार आणि डहाणू नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी प्रथमच थेट मतदारांकडून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. दोन्ही नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान उद्या (ता.17) होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जव्हारमध्ये 8 प्रभागांमध्ये 17 जागांसाठी 66 उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्षपदासाठी  5 उमेदवार आपले नशीब अाजमावत आहेत. दरम्यान 8 प्रभागांमध्ये 15 मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. 

तसेच 60 मतदान यंत्र ठेवण्यात येणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी 6 क्षेत्रिय अधिकारी, 20 मतदान केंद्र अधिकारी, मतदान अधिकारी 1, 2 , 3 अनुक्रमे प्रत्येकी 20 नेमण्यात आले आहेत. तर मतदान केंद्रावर 20 शिपाई, 30   पोलिस शिपायांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी भरारी पथकही नियुक्त करण्यात आल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैभव विधाते यांनी दिली आहे.

Web Title: marathi news local javhar dahanu local election preparation ready