माळशेज घाटात टेम्पो पलटी होऊन एकाचा मृत्यू

नंदकिशोर मलबारी
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

सरळगांव : कल्याण-अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाटातील एका वळणावर टेम्पो पलटी होऊन एक इसम मृत्युमुखी पडला असल्याची माहिती टोकावडे पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पोरे यांनी दिली.  

मुरबाडपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या माळशेज घाटातून रिकामा टेम्पो कल्याण दिशेकडे भरधाव वेगात जात असताना एका वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा टेम्पो डिवायडरला जोरात धडकला आणि पलटी झाला. यामध्ये या टेम्पोचालक खाली दबून जागेवरच ठार झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक पोरे आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत या चालकाचा मृत्यू झाला होता. या अपघातात ठार झालेल्या टेम्पो चालकाचे नाव अजय ज्ञानेश्वर दिघे(वय 26) असे असून तो जुन्नर तालुक्यातील गूंजाळवाडी (बेल्हे) येथील असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

Web Title: marathi news local malshej ghat tempo accident person dead