ऑन ड्युटी पार्टी करणारा स्टेशन मास्तर निलंबित! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 डिसेंबर 2017

कोपरखैराणे : कोपरखैरणे स्थानकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते फेरीवाल्यांविरोधात कारवाईच्या मागणीसाठी गेले असताना स्टेशन मास्तर दारू पित असल्याचे निदर्शनास आले होते. याची दखल घेत "त्या' स्टेशन मास्तराचे निलंबन केले आहे. 

मनसेचे शिष्टमंडळ बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी करणारे निवेदन देण्यासाठी रेल्वेस्थानकात गेले होते. निवेदन देण्यासाठी स्टेशन मास्तरची शोधाशोध केली; मात्र स्टेशन मास्तर अन्य चार ते पाच जणांसोबत पार्टी करत असल्याचे समजले. रमेशचंद्र झा मद्यधुंद अवस्थेतच दालनात आले, मनसे कार्यकर्त्यांनी याबाबत जाब विचारला. यावर झा मनसे कार्यकर्त्यांची मनधरणी करू लागले असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

झा याला कर्तव्यावर असताना दारू पिताना रंगेहाथ पकडल्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याची आरोग्य तपासणी करून ताब्यात घेण्याचे आश्‍वासन दिले होते. या प्रकारानंतर झा याचे निलंबन झाल्याची माहिती मनसे कळंबोली शहर सचिव संदीप गलगुडे यांनी दिली. याबाबत रेल्वे अधिकारी आणि जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही. झा याच्याकडूनही याबाबत दुजोरा मिळालेला नाही. 

Web Title: marathi news local station master suspended