कर्करुग्णांच्या निवासासाठी आणखी तीन इमारती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

मुंबई - टाटा कर्करोग रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मुंबईतील निवासासाठी तीन नवीन वसतिगृह उपलब्ध होणार आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्ट पुनर्विकासानंतर तीन इमारती यासाठी टाटा कर्करोग रुग्णालयाकडे सुपूर्त करणार आहे.

मुंबई - टाटा कर्करोग रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मुंबईतील निवासासाठी तीन नवीन वसतिगृह उपलब्ध होणार आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्ट पुनर्विकासानंतर तीन इमारती यासाठी टाटा कर्करोग रुग्णालयाकडे सुपूर्त करणार आहे.

पोर्ट ट्रस्टच्या "सीएसआर'अंतर्गत या इमारती टाटा कर्करोग रुग्णालयात उपचारांसाठी येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना राहण्यासाठी आणखी जागा मिळाली आहे. या इमारतींचे स्ट्रक्‍चरल ऑडिट झाले असून, पुनर्विकासानंतर त्या टाटा कर्करोग रुग्णालयाकडे देण्यात येणार आहेत. रुग्णालयात दर वर्षी सुमारे 67 हजार नवीन रुग्ण देशाच्या कानाकोपऱ्यांतून येतात. त्यापैकी सुमारे साडेचार लाख रुग्ण पुढील उपचारासाठी दर वर्षी येतात. या रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना अनेकदा राहण्याची सोय उपलब्ध होत नसल्यामुळे ते रस्त्यावर किंवा हॉटेलात राहतात. उपचारांसह निवासी खर्चाचा भारही त्यांना पेलावा लागतो. या रुग्णांना याआधी तीन इमारती निवासासाठी देण्यात आल्या होत्या. त्यामुळे उपचारांनंतर रुग्णांच्या जगण्याच्या कालावधीत वाढ झाल्याची नोंद रुग्णालयाने केली आहे.

सध्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या आवारात असलेल्या सेंट जुड चाईल्ड केअर सेंटरमध्ये चालवल्या जाणाऱ्या इमारतीत रक्त कर्करोगाच्या 200 रुग्णांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. ही सोय नसल्याने 25 टक्के रुग्ण उपचार अर्धवट सोडून निघून जात असल्याचे रुग्णालयाने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाले होते. शहराबाहेरून आलेल्या लहान मुलांसाठी या इमारतींमध्ये निवासासह अन्न, शिक्षणाची सोय करण्यात आली आहे.

Web Title: marathi news maharashtra news cancer patient building tata hospital