वाईनची होम डिलेव्हरी पडली सव्वा लाखाला..

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

मुंबईतल्या एका इसमाला घरपोच वाईन मागवणं चांगलंच महागात पडलंय. ज्यात या इसमाचे तब्बल सव्वा लाख रुपये क्रेडीटकार्ड मधून गायब झालेत.      

मुंबई : मुंबईतल्या एका इसमाला घरपोच वाईन मागवणं चांगलंच महागात पडलंय. ज्यात या इसमाचे तब्बल सव्वा लाख रुपये क्रेडीटकार्ड मधून गायब झालेत. अंधेरीतील या तरुणाने घरपोच मद्याची डिलेव्हरी देणाऱ्या उज्ज्वल वाईनचा नंबर इंटरनेटवरून शोधला आणि वाईन शॉपमध्ये फोन केला. त्यानंतर या इसमाचे तब्बल सव्वा लाख रुपये क्रेडीट कार्डमधून कापले गेलेत. 

सदर घटनेबाबत या इसमाने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलीये. दरम्यान, आमच्या नावाचा वापर करून, घरपोच मद्याची डिलेव्हरी मागवणार्यांना अशा प्रकारे लुटलं जात असल्याची तक्रार उज्ज्वल वाईनच्या मालकाने केलीये. 

या इसमाला क्रेडीट कार्डने पैसे भरण्यासाठी सांगण्यात आलं. त्यानंतर त्याच्या कार्डचे डीटेल्स आणि OTP घेण्यात आले. पहिल्यांदा त्याच्या अकाउंट मधून  31,777 रुपये कट झाल्याचा मेसेज आला. त्याने, त्या नंबरवर पुन्हा फोन करून विचारपूर केली असता सदर प्रकार चुकून झाल्याचं सांगितलं गेलं आणि पैसे परत येतील असं देखील सांगण्यात आलं. त्यानंतर पुन्हा त्याच्याकडून त्याच्या कार्डचे डीटेल्स घेण्यात आलेत. आणि पुन्हा 31,777 आणि 61,000 रुपये कट झाल्याचा मेसेज आला. दरम्यान, आपल्याला गंडा घालण्यात येतोय समजल्यावर या इसमाने आपलं कार्ड ब्लॉककरून याबाबत तक्रार दाखल केली.

उज्ज्वल वाईनच्या नावाने असणारा इंटरनेटवरील हा नंबर नक्की कुणाचा आहे याचा आता पोलीस शोध घेतायत. उज्ज्वल वाईनच्या नावाने इंटरनेटवर असणार हा नंबर काढून टाकण्याची देखील तक्रार करण्यात आल्याचं दुकानाच्या मालकाने केलीये. इंटरनेटवर उज्ज्वल वाईनमधून मद्य मागवू नका अश्या आशयाचे तब्बल 75 रिव्ह्यू देखील लिहिण्यात आलेत. 

"याआधीही मी या दुकानातून वाईन मागवली आहे, त्यामुळे यावेळेस ऑर्डर करताना मला काही शंका आली नाही", असं या इसमाने सांगितलंय.

त्यामुळे तुम्ही अश्याप्रकारचे पर्याय वापरत असाल, तर दोनदा क्रॉसचेक करून असे आर्थिक व्यवहार करत चला. 

WebTitle : man orders wine bottle and loses Rs1.25 lakh in 3 transactions


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news man orders wine bottle and loses Rs1.25 lakh in 3 transactions