'ट्विटर'वर #MarathaInMumbai, #MarathaKrantiMorcha 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

मराठा क्रांती मोर्चाचे #MarathaInMumbai, #MarathaKrantiMorcha आणि #MarathaMorcha असे तीन हॅशटॅग ट्विटरवर सुरू आहेत. या तिन्ही हॅशटॅगवर नेटीझन्स ट्वीट करून मोर्चातील सहभाग, पाठिंबा आणि तेथील वातावरण शेअर करीत आहेत. 

सोशल मीडियावर; विशेषतः ट्विटरवर आज (बुधवार) सकाळपासून मराठा क्रांती मोर्चा धडकायला सुरूवात झाली आहे. 

मराठा क्रांती मोर्चाचे #MarathaInMumbai, #MarathaKrantiMorcha आणि #MarathaMorcha असे तीन हॅशटॅग ट्विटरवर सुरू आहेत. या तिन्ही हॅशटॅगवर नेटीझन्स ट्वीट करून मोर्चातील सहभाग, पाठिंबा आणि तेथील वातावरण शेअर करीत आहेत. 

राजकीय नेत्यांना मोर्चापासून दूर ठेवा, असा सल्लाही ट्विटरवरून दिला जात आहे. 

शाळा-कॉलेज, ट्रॅफिकची व्यवस्था याबद्दल अपडेट देणारे ट्विट मुंबईतून केले जात आहेत. 

रेल्वेच्या व्यवस्थेसंदर्भात माहिती देणारे ट्विटदेखील केले जात आहेत. 

मराठा क्रांती मोर्चाच्या दादरमधील वॉररूममध्ये सोशल मीडिया अपडेटस् आणि लाखोंच्या संख्येने येत असलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. 

मंगळवारी संध्याकाळी #MarathaInMumbai ट्विटरच्या ट्रेंडिंग टॉपिक्समध्ये आला होता. 

Web Title: Marathi News Maratha Kranti Morcha MarathaInMumbai