कल्याण : तिसाई देवी मंदिरामागील तलावात आता गणपती विसर्जन नाही! 

रविंद्र खरात
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

कल्याण : कल्याणच्या पूर्व भागातील तिसाई देवी मंदिरामागील खासगी तलावात यंदा गणेश विसर्जन सोहळा न करण्याचा निर्णय जरीमरी सेवा मंडळाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे गेल्या 20 वर्षांची या तलावातील गणेश विसर्जनाची परंपरा खंडीत होणार आहे. यासंदर्भात काल (गुरुवार) सायंकाळी झालेल्या बैठकीत एकमताने निर्णय झाला. 

तिसाई देवी मंदिरामागील बाजूस असलेल्या खासगी तलावामध्ये गेल्या 20 वर्षांपासून विसर्जन सोहळा होत होता. यात पाच ते दहा हजार मूर्तींचे विसर्जन होत असे. 

गेल्या वर्षी गणेशोत्सवादरम्यान 6 सप्टेंबर रोजी दीड दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान तिसगावमधील तलावामध्ये काही युवकांनी एका पोलिस कर्मचाऱ्याला बुडवून मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात अनेक जणांना अटक झाली होती. त्यापैकी एक जण आजही तुरुंगात आहे. या पार्श्‍वभूमीवर तिसगावमधील तलावात गणपती विसर्जन होणार की नाही, याबाबत जरीमरी सेवा मंडळाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांची बैठक झाली. 

'आम्ही समाजसेवा करायची आणि आमच्याच मुलांना तुरुंगात पाठविले जाते. मग कशाला हवी ही समाजसेवा' अशा शब्दांत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. पोलिसांतील अधिकाऱ्यांवर कारवाईचे आश्‍वासन दिले असतानाही त्याबाबत काही झाले नसल्याचेही पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. यानंतर तिसाई देवीच्या मंदिरामागील तलावामध्ये एकाही मूर्तीचे विसर्जन करायचे नाही आणि ग्रामस्थांसाठी गावदेवी मंदिराच्या मागे कृत्रिम तलाव बनवून तिथे विसर्जनाची सोय करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

'येत्या 15 ऑगस्टनंतर तलावाच्या सुशोभिकरणाचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे या तलावात मूर्तींचे विसर्जन करण्याचा प्रश्‍नच येत नाही. यापुढे इथे विसर्जन सोहळा होणार नाही', अशी माहिती जरीमरी सेवा मंडळाचे सचिव नाना सूर्यवंशी यांनी 'सकाळ'ला दिली.

Web Title: marathi news marathi website Kalyan Ganeshotsav