राष्ट्रवादीचे राज्यभर युवा जोडो अभियान 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

मुंबई : राज्यातील तरुणांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची प्रतिमा उजळावी, यासाठी युवकांचे संघटन मजबूत करण्यासाठी राज्यभरात नव्या शाखा उघडण्याची मोहीम राष्ट्रवादीने सुरू केली आहे. 23 जुलैपासून सुरू झालेल्या या मोहिमेमुळे आतापर्यंत 400 नव्या शाखांची उभारणी करण्यात आली, अशी माहिती युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी दिली. 

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त युवक राष्ट्रवादीने राज्यभरात पहिल्या टप्प्यात पाच हजार शाखा उघडण्याचा संकल्प केला आहे. मागील 15 दिवसांत तब्बल चारशे नव्या शाखांचे उद्‌घाटन झाल्याचे कोते-पाटील यांनी सांगितले. या मोहिमेतून दोन लाख युवक राष्ट्रवादीशी जोडण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. प्रत्येक शहरात वॉर्ड तिथे शाखा, तर प्रत्येक गावात राष्ट्रवादी युवकच्या संघटन बांधणीचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. 

राज्यातील युवकांनी पुरोगामी व लोकशाहीवादी विचारांची सोबत करत सामाजिक स्थैर्य व सौहार्दाला प्राधान्य द्यावे, असा यामागचा हेतू असल्याचे कोते-पाटील म्हणाले. 

राष्ट्रवादीचे शक्‍तिस्थान ग्रामीण भाग असला, तरी शहरी युवकांना लोकशाहीवादाच्या चळवळीत जोडण्याची गरज असल्याची भावना पुढे येत आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या लोकशाही विचारांची नवी पिढी राज्यात नव्या जोमाने उभी राहील. पहिल्या टप्प्यात पाच हजार, तर पुढील वर्षभरात युवकच्या पाच हजार शाखा सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असेही कोते-पाटील यांनी स्पष्ट केले.

Web Title: marathi news marathi website mumbai news NCP politics