बुचर बेटावरील आगीचा इंधनावर परिणाम नाही 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

मुंबई : मुंबईतील पूर्व किनाऱ्याजवळ बुचर बेटावर लागलेली आग विझविण्याचे प्रयत्न शनिवारीही सुरू होते. आग नियंत्रणात असून उद्या(ता. 8)पर्यंत संपूर्ण आग विझण्याची शक्‍यता अधिकाऱ्यांनी वर्तवली. दरम्यान, या घटनेमुळे इंधन पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. 

आग लागलेल्या टाकीतील डिझेल शनिवारी काढण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून या टाकीच्या शेजारील दोन टाक्‍यांमधूनही इंधन काढण्यात आले आहे. परिसरात इंधनाच्या आठ टाक्‍या आहेत. शनिवारी परिसरातील वाढलेले तापमान कमी करण्याच्या दृष्टीनेही उपाययोजना करण्यात आल्या. त्यासाठी पाण्यासह कार्बनडाय ऑक्‍साईडच्या फोमचाही वापर करण्यात आला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

अग्निशमन दल आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचे कर्मचारी त्यासाठी समन्वयाने काम करत होते, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगळे यांनी दिली. बुचर बेटावरील 32 हजार मेट्रिक टनाच्या इंधन टाकीला शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता आग लागली होती. वीज कोसळून ही दुर्घटना घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

Web Title: marathi news marathi websites Butcher Island Mumbai News