ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी ई कंपन्यांनी उपाय करावेत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

मुंबई : आपल्या ग्राहकांचा तपशील सुरक्षित ठेवण्यासाठी ई कंपन्या आणि ई कॉमर्स कंपन्यांनी सुरक्षेसाठी खास उपाय योजले पाहिजेत, अशी सूचना या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सोमवारी (ता. 28) येथील एका परिसंवादात केली. 

मुंबई : आपल्या ग्राहकांचा तपशील सुरक्षित ठेवण्यासाठी ई कंपन्या आणि ई कॉमर्स कंपन्यांनी सुरक्षेसाठी खास उपाय योजले पाहिजेत, अशी सूचना या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सोमवारी (ता. 28) येथील एका परिसंवादात केली. 

रिटेल असोसिएशन ऑफ इंडियातर्फे आयोजित रिटेल सीएफओ परिसंवादात अनेक मान्यवर सहभागी झाले होते. हा तपशील सुरक्षित राहावा, यासाठी मोठी यंत्रणा ठेवायला हवी. आपले सॉफ्टवेअर वैध असावे. कोणतेही शॉपिंग ऍप मोबाईलवर डाऊनलोड करताना आपली संमती मागितली जाते. त्या वेळी हा तपशील मोबाईलवरच राहातो की, कंपनीच्या सर्व्हरवर जातो हेही तपासले पाहिजे, आदी विचार या वेळी मांडण्यात आले. नितीन खन्ना, प्रताप स्वरूप, विशाल जैन आदी अधिकारी परिसंवादात सहभागी झाले होते. 

ई कॉमर्स कंपन्या, ऑनलाईन शॉपिंग कंपन्या आदींकडे ग्राहकांचा मोठा तपशील असतो. हा तपशील त्यांच्याकडून गुन्हेगारांकडे जाण्याची शक्‍यताही असते. आयटी कायद्यानुसार ज्या कंपनीकडे असा तपशील असतो, त्यांनी याबाबत पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवली पाहिजे; अन्यथा त्या तपशिलाची चोरी किंवा गळती झाली तर गुन्ह्यास साह्य केल्याचा गुन्हा कंपनीच्या मालक किंवा अधिकाऱ्यांवर दाखल होऊ शकतो. त्यामुळे तशा स्थितीत आम्ही पुरेशी सायबर सुरक्षा व्यवस्था ठेवली होती, हे पोलिसांना दाखवणे गरजेचे आहे, असे सायबर कायदे विषयातील तज्ज्ञ वकील प्रशांत माळी यांनी सांगितले. 

ग्राहकांच्या तपशिलाची चोरी किंवा गळती झाली, तर त्यासाठी तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच लाख रुपये दंडाची शिक्षा आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही शिक्षा होऊ शकते; तसेच कंपनीविरुद्ध एकटा ग्राहक किंवा अनेक ग्राहक एकत्रितरित्या दावे सादर करू शकतो, असेही माळी यांनी सांगितले. 

सायबर विमा 
सायबर ठकसेनांपासून कंपनीकडील माहितीचे संरक्षण करण्यासाठी कंपनीने सायबर विमा उतरणे आवश्‍यक आहे. तो घेताना आपल्या गरजांनुसार घ्यावा. विमा कंपनीने सर्वसाधारणपणे तयार केलेले पॅकेज जसेच्या तसे घेऊ नये. विम्याच्या अटींचा तपशील व्यवस्थित वाचावा किंवा कायदे सल्लागारांना विचारावे, असे प्रशांत माळी यांनी सांगितले.

Web Title: marathi news marathi websites cyber crime cyber security