कल्याणमधील 23 हजार शेतकऱ्यांकडे आठ कोटी रुपयांची वीजबिलाची थकबाकी 

रविंद्र खरात 
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

कल्याण : 'महावितरण'च्या कल्याण परिमंडळातील 23, 210 शेतकऱ्यांकडे मिळून एकूण आठ कोटी 35 लाख रुपयांची वीजबिलाची थकबाकी आहे. त्यातील 7,135 ग्राहकांनी गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ विजेचे बिल भरलेले नाही, अशी आकडेवारी समोर आली आहे. 'थकबाकीदारांसाठी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना जाहीर केली आहे' अशी माहिती 'महावितरण'च्या कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता रामराव मुंडे यांनी केले. 

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण परिमंडळात एकूण 38,885 शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. पेण मंडळात एकूण 16,395 ग्राहक असून त्यापैकी 8,676 ग्राहकांकडे मिळून दोन कोटी 33 लाख रुपयांची थकबाकी आहे. पालघर मंडळात एकूण 13,014 कृषिपंप ग्राहक असून त्यापैकी 8,239 ग्राहकांकडे मिळून एकूण तीन कोटी 39 लाख रुपयांची थकबाकी आहे. वसई मंडळात एक कोटी 44 लाख, तर कल्याण मंडळात एक कोटी 15 लाख रुपयांची थकबाकी आहे. 

या पार्श्‍वभूमीवर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या कृषी संजीवनी योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन 'महावितरण'ने केले आहे. या योजनेची अंमलबजावणी तत्काळ केली जात असून पाच समान हप्त्यांत थकबाकी भरण्याची संधी 'महावितरण'तर्फे दिली जात आहे. यात मूळ रकमेवरील व्याज आणि दंड माफ केला जाणार आहे. 

या योजनेत सहभागी होण्यासाठी एप्रिल ते जून 2017 या तीन महिन्यांचे चालू बिल नोव्हेंबर 2017 पूर्वी भरावे लागेल. मार्च 2017 अखेरीस असलेली मूळ थकबाकीची रक्कल पाच समान हप्त्यांत भरण्याची मुभा आहे. हप्ते वेळेवर न भरल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नसल्याचे रामराव मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. 

Web Title: marathi news marathi websites kalyan news marathi news MSEDCL