आजपासून वीज सुरक्षा सप्ताह 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

मुंबई : वीजग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये विद्युत सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातर्फे विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. त्याचे उद्‌घाटन उद्या (ता.11) ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत एका कार्यक्रमात करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला उद्योगमंत्री सुभाष देसाई हे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. 

सप्ताहानिमित्ताने रायगड जिल्ह्यात विद्युत निरीक्षण विभाग, पेण-रायगड यांच्यातर्फे महावितरण कंपनी, विद्युत कंत्राटदार आणि रोटरी क्‍लबच्या सहकार्याने विद्युत सुरक्षिततेविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील शाळांमध्ये "विद्युत सुरक्षा' या विषयावर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा होणार आहेत.

चित्रफितीद्वारे मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. महावितरण कंपनीच्या विद्युत कर्मचाऱ्यांनासुद्धा कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती रायगड विद्युत निरीक्षण विभागाचे निरीक्षक नंदकिशोर बेहरम यांनी दिली. सप्ताहाची सांगता 17 जानेवारीला नांदेड येथे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: marathi news marathi websites Mumbai News chandrashekhar bawankule