शेतकरी आत्महत्या तपास पोलिस निरीक्षकांकडे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

मुंबई : शेतकरी आत्महत्या तपासाची जबाबदारी पोलिस निरीक्षक (पीआय) आणि सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) यांच्याकडे देण्याबाबतचा आदेश गृह विभागाने शनिवारी (ता. 16) काढला. 

मुंबई : शेतकरी आत्महत्या तपासाची जबाबदारी पोलिस निरीक्षक (पीआय) आणि सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) यांच्याकडे देण्याबाबतचा आदेश गृह विभागाने शनिवारी (ता. 16) काढला. 

यापूर्वी शेतकरी आत्महत्येचा तपास पोलिस उपनिरीक्षकाच्या मार्गदर्शनाखाली हवालदार करत होते. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव यांची 16 ऑगस्टला बैठक झाली होती. या बैठकीत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी काही सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार आत्महत्यांचा तपास पोलिस उपनिरीक्षक वा त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे देण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार गृह विभागाने हे आदेश काढले आहेत. 

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना मदत देताना आत्महत्येचे कारण तत्काळ शोधणे आवश्‍यक आहे. त्यासाठी न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेने दोन दिवसांत अहवाल सादर करावा, असे आदेशही गृह विभागाने दिले आहेत. शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणाची सर्व कार्यवाही एका आठवड्यात पूर्ण करण्याची दक्षता पोलिस अधीक्षक आणि पोलिस आयुक्‍त यांनी घ्यावी, असे आदेशही सरकारने दिले आहेत.

Web Title: marathi news marathi websites Mumbai news Farmers suicide