डोंबिवलीत विद्यार्थ्यांसाठी 'फ्लाईंग योगा'चे प्रशिक्षण

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

डोंबिवली: विद्यार्थ्यांमध्ये  स्मरणशक्ती वाढावी व सकारात्मक दृष्टीकोन निर्माण व्हावा यासाठी नेहमी घेण्यात येणाऱ्या जग्न्मान्य अशा  ‘भावातीत योगा‘ प्रकारातील महत्वाचे असे ‘फ्लाईंग योगा’ शिकविण्यासाठी बुधवारी अमेरिकन शास्त्रज्ञ आले होते.

डोंबिवली: विद्यार्थ्यांमध्ये  स्मरणशक्ती वाढावी व सकारात्मक दृष्टीकोन निर्माण व्हावा यासाठी नेहमी घेण्यात येणाऱ्या जग्न्मान्य अशा  ‘भावातीत योगा‘ प्रकारातील महत्वाचे असे ‘फ्लाईंग योगा’ शिकविण्यासाठी बुधवारी अमेरिकन शास्त्रज्ञ आले होते.

फ्लाईंग योगा या कन्सेप्टद्वारे 'ब्रेन मॅपिंग' करिता देशभरात फक्त दोन ते तीन ठिकाणी फ्लाईंग योगा शिकविला जातो. त्यामुळे डोंबिवली पश्चिमेकडील स. है. जोंधळे शाळेत विदेशी शास्त्रज्ञ येऊन विज्ञानाव्दारे योगाचे महत्त्व पटवून दिले. याला वेगळे महत्व आहे.आपल्या शरीरात व मेंदूत योगामुळे काय काय बदल होतो. स्मरणशक्ती कशी वाढते व सकारात्मक विचार कसे तयार होतात, याचा अभ्यासात कसा उपयोग  होतो त्याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संचालक सागर जोंधळे यांनी केले होते.

'ब्रेन रिसर्च इन्स्टिट्यूट ' या अमेरिकेच्या संस्थेद्वारे डोंबिवलीच्या जोंधळे शिक्षण समूह येथे 'ट्रान्स मेडिटेशन' या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आला होता. डॉ सिंथीया एलेक्झेंडर व डॉ इलेरिक एलेक्झांडर या दाम्पत्याने या वेळी भावातीत योगा (ट्रान्स मेडिटेशन) या ध्यानधारणे विषयी विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले.

आपल्या अंतरंगात विचाराचे तरंग उठत असतात.यावर नियंत्रण मिळविणे व विचार समूहांना नियंत्रित करणे हे या 'ट्रान्स मेडीटेशन'च्या तंत्राने शक्य होते.या बाबतची माहिती यावेळी एलेकझेंडर दाम्पत्यांनी यावेळी विद्यार्थी व शिक्षक यांना दिली.

डॉ. अल्बर्ट आईस्टाईन यांचा मेंदू देखील ३ ते ४ टक्के वापरला जात असल्याची माहिती देत जर हे ट्रान्स मेडिटेशन केले तर आपली एकाग्रतेची वाढ आपण करू शकतो असे या वेळी एलेक्झांडर यांनी सांगितले. शाळकरी मुले तणावग्रस्त बनून आत्महत्त्या करीत आहेत. या ध्यानधारणेमुळे एकाग्रता वाढून मुले आपला विकास कारू शकतात असेदेखील या वेळी त्यांनी सांगितले. येणाऱ्या काही वर्षात जग वेगवान होणार आहे. त्यामुळे आणखी तणाव वाढणार असल्याचे देखील या वेळी या दाम्पत्याने सांगितले. त्यावर ट्रान्स मेडिटेशन हा प्रभावी व वीनाखर्च उपाय आहे. मूळ भारतातील ही ध्यानधारणा पद्धती असून वैदिक शास्त्रातून ही आली असल्याचे त्यांनी सांगितले.

या सेमिनारला जोंधळे विद्या समूहाच्या आजीवन सचिव वैशाली जोंधळे, कार्यकारी संचालक सागर जोंधळे,  देवेंद्र जोंधळे, श्वेता जोंधळे आदी जोधळे शिक्षण समूहाचे पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: marathi news marathi websites Mumbai News Flying Yoga