ऑनलाइन अर्ज करा 'डीपी रिमार्क' मिळवा! 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 17 सप्टेंबर 2017

मुंबई : मुंबई महापालिकेच्या 'प्रारूप विकास आराखड्यातील 'डीपी रिमार्क्‍स' आवश्‍यक ते शुल्क भरून ऑनलाइन मिळवता येतील, अशी माहिती अतिरिक्त पालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी दिली. 

मुंबई महापालिका क्षेत्रात भूखंड विकसित करताना विकास नियोजन आराखड्यानुसार दिले जाणारे 'डीपी रिमार्क्‍स' (विकास नियोजन अभिप्राय) महत्त्वाचे असतात. ही बाब लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने ते ऑनलाइन देण्याची सोय केली आहे. त्यामुळे घरबसल्या किंवा कार्यालयातून ऑनलाइन अर्ज करून आणि 'रिमार्क'साठी दोन हजार रुपये ऑनलाइन शुल्क भरून मिळवता येईल. 

एखाद्या भूखंडावर आरक्षण असेल, तर त्याबाबतची माहिती, भूखंड निवासी क्षेत्रात आहे, की अन्य क्षेत्रात, याची माहिती 'डीपी रिमार्क्‍स'मध्ये असते. 'डीपी रिमार्क्‍स' मिळवण्यासाठी महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात जाण्याची गरज नाही. पूर्वी यासाठी सात दिवस लागत असत. 

ऑनलाइन पद्धत 
पालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावर आपल्या डाव्या हाताला 'संबंधित दुवे' (Related Links) असे शीर्षक असणाऱ्या रकान्याच्या शेवटी 'अधिक' (More) या शब्दावर क्‍लिक करावे. यानंतर उघडणाऱ्या पानावर 'Draft DP 2034' अशी लिंक आहे, त्यावर क्‍लिक करावे. यानंतर उघडणाऱ्या 'लॉग इन पेजवर रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर आपल्याला ज्या भूखंडाबाबत रिमार्क्‍स हवे असतील, तो भूखंड महापालिकेच्या विभागांपैकी ज्या विभागात येतो तो विभाग निवडावा.

Web Title: marathi news marathi websites Mumbai news mumbai municipal Corporation