कुलगुरूपदासाठी मुंबई विद्यापीठाची जाहिरात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची निवड करणाऱ्या शोध समितीने या पदासाठी वर्तमानपत्रांत जाहिरात देऊन इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुकांना 14 फेब्रुवारीपर्यंत अर्ज पाठवण्याची मुदत दिली आहे. 

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची निवड करणाऱ्या शोध समितीने या पदासाठी वर्तमानपत्रांत जाहिरात देऊन इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुकांना 14 फेब्रुवारीपर्यंत अर्ज पाठवण्याची मुदत दिली आहे. 

ऑनस्क्रीन ऍसेसमेंटप्रकरणी वादग्रस्त ठरलेले कुलगुरू संजय देशमुख यांच्या हकालपट्टीनंतर शोध समितीची स्थापना करण्यात आली. इस्रोचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त झालेल्या या समितीत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीचे श्‍यामलाल सोनी तसेच सिडकोचे उपाध्यक्ष भूषण गगराणी यांचा समावेश आहे. गत आठवड्यात समितीने राज्यपाल व कुलपती सी. विद्यासागर राव यांची भेट घेतल्यानंतर ही जाहिरात वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध केली. 

कुलगुरूपदासाठी आवश्‍यक असलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव, कौशल्ये व नैपुण्ये याची माहिती मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. उमेदवारांनी अर्जासह आपल्या उमेदवारीचे समर्थन आणि विद्यापीठाच्या उत्कर्षाबाबतची दूरदृष्टी व्यक्त करणारी दोन पानांची टिपणी सोबत जोडावी. तसेच उमेदवारांच्या कामाशी परिचित तीन नामांकित व्यक्तींची नावे व संपर्काचे तपशील नमूद करावेत.

समितीच्या विचारार्थ विविध संस्थादेखील योग्य व्यक्तींची नावे सुचवू शकतात. अर्ज किंवा नामांकनांच्या चार प्रतीसोबत संगणकीय प्रत नोडल अधिकाऱ्यांकडे 14 फेब्रुवारीपर्यंत पाठवायची आहे, असे जाहितातीत म्हटले आहे. 

Web Title: marathi news marathi websites mumbai news mumbai university mumbai education