धमकीप्रकरणी शेरा विरोधात गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

मुंबई : अभिनेता सलमान खान याचा अंगरक्षक शेराच्या नावाने धमकीचा दूरध्वनी केल्याप्रकरणी खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यावसायिक महिलेने याबाबत तक्रार केली आहे. 

मुंबई : अभिनेता सलमान खान याचा अंगरक्षक शेराच्या नावाने धमकीचा दूरध्वनी केल्याप्रकरणी खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यावसायिक महिलेने याबाबत तक्रार केली आहे. 

सलमान खानचा अंगरक्षक शेरा आहे, अशी ओळख सांगणाऱ्या व्यक्तीचा शुक्रवारी दुपारी फोन आला. त्याने अतिशय घाणेरड्या शब्दांत शिवीगाळ केली, असे तक्रारदार महिलेने सांगितले. 'बिग बॉस' मालिकेतून काढून टाकण्यात आलेल्या झुबेर खानला मदत करत आहे. त्यामुळे अंडरवर्ल्डमधून धमक्‍या येत आहेत, असेही या महिलेने सांगितले. 
बिग बॉसमध्ये सलमान खान आणि झुबेर खान यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर झुबेर खानला बिग बॉसमधून काढून टाकण्यात आले होते. या वेळी या महिलेने झुबेरचे समर्थन केले होते. त्याचबरोबर सलमानने झुबेरबद्दल अपशब्द वापरले आहेत. त्यामुळे सलमानने झुबेरची माफी मागावी, अशी जाहीर मागणीही या महिलेने केली होती. त्यानंतर तिला धमक्‍या येत आहेत. 

अंडरवर्ल्डमधूनही फोन? 
बिग बॉस वादात झुबेर खानचे समर्थन करताच तक्रारदार महिलेला धमक्‍या येऊ लागल्या होत्या. एका गुंडानेही या महिलेला फोन करून सलमान खानबरोबर माझेही चांगले संबंध नाहीत. त्यामुळे या प्रकरणात मदत करण्यास तयार आहे, असे सांगितल्याचा दावा करण्यात येत आहे; परंतु पोलिसांनी त्याला दुजोरा दिला नाही.

Web Title: marathi news marathi websites Mumbai News Salman Khan Shera Bodyguard