मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 27 ऑगस्ट 2017

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात एकमेकांचे शत्रू असलेल्यांच्या घरी एकाचवेळी जाऊन गणपती दर्शन घेत राजकीय समतोल राखण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांच्याही निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी काल भेट दिली. 

कॉंग्रेसमध्ये नाराज असलेले नारायण राणे आता फक्त तांत्रिकदृष्ट्याच पक्षात आहेत. राणे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे भाकीत वर्तवले जात आहे. ते भाजप पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात असून त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरवण्याच्या हालचालीही जोरात सुरू आहेत. अशा वातावरणात मुख्यमंत्री फडणवीस पहिल्यांदाच राणेंच्या जुहू येथील निवासस्थानी गणपती दर्शनाच्या निमित्ताने गेले होते. या वेळी सुमारे तासभर दोन्ही नेत्यांमध्ये कौटुंबिक आणि राजकीय चर्चाही झाली. 

उद्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मुंबईत येत आहेत. या वेळी राणे शाहंची भेट घेण्याची शक्‍यता आहे. अशा परिस्थितीत मित्रपक्ष शिवसेना दुखावला जाऊ नये, याची काळजीही मुख्यमंत्र्यांना आहे. त्यामुळे राणेंच्या घरून निघाल्यावर मुख्यमंत्र्यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या वांद्रे पाली हिल इथल्या निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतल्याची चर्चा आहे.

Web Title: marathi news marathi websites Mumbai News Shiv Sena Devendra Fadnavis