गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या मागे होता दारुचा अड्डा; पोलिस अधीक्षकांनी केला उध्वस्त

दीपक हीरे
सोमवार, 1 जानेवारी 2018

वज्रेश्वरी : ठाणे जिल्हा पूर्ण गावठी दारुमुक्त करण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉक्टर महेश पाटील यांनी गेल्या काही महिन्यांपासून मोहीम सुरू केली आहे. पण भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी ठाण्याच्या मागेच दारुचा अड्डा चालत असल्याचे उघडकीस आल्याने या मोहिमेचा पूर्ण फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. हा दारुचा अड्डा पोलिअ अधीक्षकांच्या एका पथकाने उध्वस्त केला असून तेथून मोठ्या प्रमाणात गावठी व देशी दारू जप्त केली आहे.

 ठाणे जिल्हा गावठी दारुमुक्त करण्याच्या उद्देशाने प्रशासनाने ठिकठिकाणी दारुचे अड्डे उध्वस्त केले. गणेशपुरी पोलिस ठाण्याच्या मागे काल (रविवार) सायंकाळी दारुबंदी पथकाने धाड टाकून गावठी दारू कॅन, देशी दारू बॉटल आणि इंग्लिश दारू व बिअर असा एकूण २३,३९८ रुपयांचा दारुचा साठा जप्त केला आहे. गुरुनाथ जाधव या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे ग्रामीण पोलिसच्या विशेष पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक उमेश पाटील आणि त्यांच्या अन्य पाच सहकार्‍यांनी ही कारवाई केली.

Web Title: marathi news marathi websites mumbai news thane news Thane crime news