मागण्या मान्य न झाल्यास पेट्रोल वितरकांचा 'बंद' 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

मुंबई : आपल्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाहीत तर येत्या 27 ऑक्‍टोबरपासून बेमुदत 'बंद'चा इशारा 'युनायटेड पेट्रोलियम फ्रंट' या महासंघाने आज मुंबईत झालेल्या बैठकीत दिला. देशभरातील सुमारे 54 हजार पेट्रोल वितरकांचे संघटित नेतृत्व करणाऱ्या तीन संघटनांची ही संघटना आहे. 

आजच्या बैठकीत विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत 2016 मध्ये ऑइल कंपन्यांबरोबर झालेल्या कराराचे पालन झाले नाही. तसेच विपणन शिस्त मार्गदर्शिकेमधील अन्यायकारक तरतुदी आणि त्याची अंमलबजावणी करताना केलेले दंड, कबूल केलेले; मात्र अद्याप दिले नसलेले कमिशन, रोज बदलणाऱ्या दरामुळे ग्राहक आणि वितरकांचे नुकसान, तसेच राज्यानुसार बदलणारे दर आदी प्रश्‍नांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

वस्तू व सेवा करांतर्गत इंधनाचा समावेश करावा. त्यामुळे इंधन स्वस्त व समान होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्‍त करण्यात आली. या मागण्या केंद्र सरकारने मान्य नाही केल्या तर येत्या 13 ऑक्‍टोबरला देशातील 54 हजार पंप खरेदी-विक्री व्यवहार बंद ठेवतील. सरकारने कोणत्याच मागण्या मान्य केल्या नाहीत तर 27 ऑक्‍टोबरपासून बेमुदत 'बंद' पाळण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: marathi news marathi websites Petrol Prices in India Indian Economy Mumbai News Maharashtra Petrol