''निवडणुकांमध्ये भाजपकडे करकरीत नोटा येतात कुठून?''

सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

कर्जत (रायगड) : जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा सगळ्याच निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवारांकडे २ हजारांच्या नव्या करकरीत नोटा येतात कुठून ? अगदी एकेका उमेदवाराकडे २५ - ३० लाखापर्यंत निधी येतो. भाजप उमेदवारांच्या या करकरीत नोटा पाहून आम्हाला भावकीची, नातेवाईकांचीही मते मिळेनात. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच नोटाबंदीचा निर्णय घेतला होता की काय ?असा सवाल माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी ‘चिंतन शिबिरात’ उपस्थित केला.

निवडणुकीत करकरीत नोटा येत असतील तर केंद्र सरकारने नक्की किती रक्कमेच्या नोटा छापल्या आहेत याची माहिती राष्ट्रवादीच्या खासदारांनी संसदेच्या माध्यमातून मिळवावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

भाजप सरकार २०२४ च्या निवडणुकीतही परत सत्तेवर येईल असा दावा केला जातोय. २०२४ मध्येही नोटबंदीसारखा निर्णय घेण्याचे भाजपच्या डोक्यात आहेत की काय असाही सवाल पाटील यांनी उपस्थित केला.

Web Title: marathi news marathi websites Raigad News Jayant Patil Demonetization BJP