भीमा कोरेगावमधील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बौद्ध बांधव व राष्ट्रीय काँग्रेसची निषेध रॅली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

मोखाडा : भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ मानवंदनेसाठी आलेल्या भीमसैनिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत मोखाड्यात बसस्थानकापासून तहसील कार्यालयापर्यंत मोखाड्यातील बौद्ध बांधव व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध रॅली काढण्यात आली यावेळी फडवणीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 1 जानेवारी 1818 रोजी 500 महारांनी 28 हजार पेशव्यांची दाणादाण करत पेशवाई संपुष्टात आणली, यामुळे शौर्यदिन साजरा करण्यासाठी येथे दरवर्षी लाखो संख्येने दलित बांधव भीमकोरेगावला मानवंदनेसाठी येत असतात.

मोखाडा : भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ मानवंदनेसाठी आलेल्या भीमसैनिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत मोखाड्यात बसस्थानकापासून तहसील कार्यालयापर्यंत मोखाड्यातील बौद्ध बांधव व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध रॅली काढण्यात आली यावेळी फडवणीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 1 जानेवारी 1818 रोजी 500 महारांनी 28 हजार पेशव्यांची दाणादाण करत पेशवाई संपुष्टात आणली, यामुळे शौर्यदिन साजरा करण्यासाठी येथे दरवर्षी लाखो संख्येने दलित बांधव भीमकोरेगावला मानवंदनेसाठी येत असतात. परंतु यावर्षी मात्र काही समाज कंटकांनी मानवंदनासाठी येणाऱ्या भीमसैनिकांवर भ्याड हल्ला करत लहान बालक महिला व वाहनांची अचानकपणे हल्ला करून तोडफोड केली आहे. याच्या निषेधार्थ  मोखाड्यात निषेध रॅली काढण्यात आली.

यावेळी तहसिल कार्यालयासमोर आल्यानंतर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आरिफ मणियार यांनी आपल्या भाषणात सरकारवर जोरदार हल्लाबोल करत भीमा कोरेगाव येथे झालेल्या हल्ले खोरांना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा यापेक्षा मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तर आरपीआयच्या वतीने मोठे उग्र आंदोलन छेडून सरकारला दखल घेण्यास भाग पाडू असा इशारा मोखाडा आरपीआय तालुका कार्याध्यक्ष राजु साळवे यांनी दिला आहे. तसेच याबाबतचे निवेदन मोखाडा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जमशेद लारा (काँग्रेस शहर अध्यक्ष) आरिफ भाई मणियार (काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष) राजुभाउ साळवे आरपीआय मोखाडा तालुका कार्याध्यक्ष संजय गायकवाड आरपीआय जेष्ठ नेते रमेश शिंदे (आंबेडकर पँथर ग्रुप उपाध्यक्ष) धमपाल शेजवळ युवा नेते सदाम शेख तेजस रोकडे दत्तात्रय शिंदे रमेश लामठे उमेश गभ यावेळी जमशेद लारा (काँग्रेस शहर अध्यक्ष) आरिफ भाई मणियार (काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष) राजुभाउ साळवे आरपीआय मोखाडा तालुका कार्याध्यक्ष संजय गायकवाड आरपीआय जेष्ठ नेते रमेश शिंदे (आंबेडकर पँथर ग्रुप उपाध्यक्ष) धमपाल शेजवळ युवा नेते सदाम शेख तेजस रोकडे दत्तात्रय शिंदे रमेश लामठे उमेश गभाले नितीन साळवे संदिप राऊत आकाश डोळस तसेच काँग्रेस कार्यकर्ते  व भीमसैनिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते
.

Web Title: Marathi news mokhada news rally