नद्याजोड प्रकल्पाच्या आडून, पाणी गुजरातला नेण्याचा डाव

भगवान खैरनार
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

मोखाडा : जव्हार मोखाडा तालुक्यातील क्षेत्रातून जाणाऱ्या दमणगंगा नदीवरील नदीजोड प्रकल्प हा स्थानिक लोकांच्या भल्यासाठी नाही तर गुजरात आणि इतर भागाच्या विकासासाठी वापरण्यात येत असल्याचा आरोप जव्हार मोखाड्यातील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी केला असून याबाबतची माहिती देण्यासाठी झालेल्या बैठकीतच अनेक नागरीकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करीत याला विरोध केला आहे. याबाबत 15 फेब्रुवारीला जव्हार येथे पुन्हा जनसुनावणी होणार आहे.

दमणगंगा खोऱ्यातील पाणी अडवून ते गुजरात आणि अनेक भागात वळविण्यात येणार असून याबाबत जव्हार मोखाडा अशा ज्या-ज्या क्षेत्रातून हे पाणी जाणार आहे, तिथल्या लोकांना याबाबत माहीती मिळावी आणि यावर सुनावणी होऊन हरकती मागविण्यात येणार आहेत. यामुळे या प्रकल्पाची माहीती घेण्यासाठी जव्हार, मोखाडा तालुक्यातील अनेक लोकप्रतिनिधी व सर्व नागरीक उपस्थित राहीले. यावेळी पाणीसाठा जव्हार, मोखाडा तालुक्यात आणि पाणी मात्र मुंबई, गुजरातकडे वळविण्याचा हा घाट असल्याचा आरोप येथे उपस्थित सर्वांनी केला. यामुळे या भागाला एकूण पाणीसाठ्याच्या फक्त 14 टक्केच पाणी देण्याचा आणि बाकी पाणी वळविण्याचाच यामागे हेतू असल्याचे यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, जव्हारचे माजी नगराध्यक्ष दिनेश भट यांनी सांगितले. यामुळे आता सुनावणीच्या वेळी येथील ग्रामपंचायती आणि विविध क्षेत्रातील नागरीक लेखी तक्रार करणार आहेत.  

याशिवाय सर्वच ग्रामपंचायती या विरोधात ठरावही घेणार आहेत. यामुळे आज घडीला या दमणगंगा खोरे प्रकल्प प्रकरण चागलेच तापले आहे. या प्रश्नावर प्रसंगी तिव्र आंदोलन छेडण्याचा विचारही आज झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे. त्यामुळे नदीजोड प्रकल्पाचे पाणी पेटणार आहे. एवढे मात्र, आजच्या बैठकीतून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पालघर जिल्हयात बांधण्यात आलेल्या धरणांचे पाणी मुंबई, वसई-विरारसह मिरा भाईंदर महापालिकांना देण्यात आले आहे. मात्र, येथील आदिवासी प्रत्येक वर्षी पाण्यासाठी वणवण भटकतो आहे. त्यामुळे संतापलेले लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी दमणगंगा खोरे प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला आहे. तसेच हे पाणी गुजरातला न नेण्याचा निर्धार जव्हार, मोखाड्यातील नागरिकांनी केला आहे.

Web Title: Marathi news mokhada news river joint gujrat water