तनिष्कातर्फे कर्करोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

गजानन चव्हाण 
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

खारघर : भारतात कॅन्सर आजाराचे प्रमाण वाढले आहेत. त्यात प्रामुख्याने उशिरा लग्न, वयाच्या 35 नंतर उशिरा मुल होऊ देणे अथवा मुलच होऊ न देणे, मुलांना स्तनपान न करविणे, आहारात स्निग्ध पदार्थ, उंचीच्या मानाने वजन जास्त असणे, वातावरणातील वाढलेले रेडीएशन आणि अनुवांशिकता  आदी विविध कारणामुळे महिलांमध्ये स्तनाच्या  कॅन्सरचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन तनिष्का ग्रुप खारघर, वसंता मेमोरियल ट्रस्ट आणि खारघर केरला समाजच्या वतीने रविवार कर्करोग, निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

या शिबिरात अपोलो हॉस्पिटलच्या डॉ. मिती लंबोदरी, डॉ. अनुजा थोमस या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तपासण्या करण्यात आल्या. तपासणीत काही महिलांना कॅन्सरची लक्षणे दिसून आल्यास वसंता मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून अल्पदरात उपचार केले जाणार आहे. या शिबिराला नगरसेविका लीना गरड, हर्षदा उपाध्याय, नेत्रा पाटील यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी वसंता मेमोरियल ट्रस्टच्या जयलक्ष्मी कृष्णन, केरला समाजचे पदाधिकारी सुमा सुनील, लता वाडियार, बिनी सुरेन्द्रन, खारघर तनिष्का समन्वयक राजश्री कदम, साक्षी सागवेकर गट प्रमुख सुमित्रा चव्हाण, भानुप्रिया पटनायक तर सदस्य वृषाली सुर्वे, विजया मोहिते, सुनंदा कुंभार, विद्या पाचगणे, पुष्पलता जाधव, वृषाली शेडगे, सुनिता मुलीक, सरोज पवार, संगीता फुलपगार, सुनिता पेटकर, संध्या शारबिद्रे, दिनी सुरेन्द्रन, समीरा देशपांडे, मोना अडवाणी, गीता चौधरी, वनिता पाटील, संतोषी चव्हाण, अनिता दाभट, बिना गोगरी, सुरेखा घोडके, वनिता तामंडे, रुपाली पाटणे, संगीता पवार, प्रतिभा महाले, नेत्रा पाटील, वनिता पन्हाळकर यांनी मेहनत घेतली. 

Web Title: Marathi news mumbai cancer seminar organised by tanishka