वसईच्या मच्छीमारांची झाईच्या समुद्रात घुसखोरी

अच्युत पाटील
गुरुवार, 22 मार्च 2018

बोर्डी - झाईच्या समुद्रात वसईच्या मच्छीमारांनी घुसखोरी करून मासेमारी सुरू केल्याने, बलसाड ते सातपाटी भागातील मच्छिमारांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत असुन, तोडगा न निघाल्यास मोठा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बोर्डी - झाईच्या समुद्रात वसईच्या मच्छीमारांनी घुसखोरी करून मासेमारी सुरू केल्याने, बलसाड ते सातपाटी भागातील मच्छिमारांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत असुन, तोडगा न निघाल्यास मोठा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मच्छिमारांसाठी पुर्वीपासून सिमारेशा बांधून दिल्या असतानाही घुसखोरी करून मच्छिमारी करण्याचे प्रकार नेहमीच होत असतात. मागील दोन महिन्यापासून वसई भागातील मच्छीमारांनी झाईच्या हद्दीत जाळी टाकल्याने स्थानिक मच्छिमारांची जाळी खराब होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. यामुळेच चालू हंगामात मासेवारीवर संक्रात आली आहे.  अशा परिस्थितीत उदरनिर्वाह करताना दमछाक होत असतानाच बाहेरील मच्छीमार घुसखोरी करून स्थानिक मच्छमारांवर अन्याय करित असल्याने प्रचंड असंतोष आहे.

हा प्रश्न सामंजस्याने सोडवून तोडगा काढण्यासाठी गुरूवार दिनांक 22 मार्च रोजी झाई येथील समुद्र किनाऱ्यावर सकाळी 10 वाजता एक बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी सुमारे दिडशे मच्छीमार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत चर्चा करण्यासाठी वसई परिसरातील मच्छीमार संस्थांच्या प्रतिनिधिनां निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती झाई मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष योगेश माच्छी व राकेश मांगेला यांनी सांगितले.

Web Title: marathi news mumbai fisherman fishing