'सकाळ' बातमीनंतर धोकादायक पोलिस ठाण्याच्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम हाती 

रविंद्र खरात 
सोमवार, 8 जानेवारी 2018

कल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याची इमारत धोकादायक झाली असून त्यामुळे रेल्वे प्रवाश्यांची सुरक्षा बघणारे रेल्वे पोलिस यांचा जीव टांगणीला लागल्याचे चित्र दैनिक 'सकाळ'ने 7 सप्टेंबर 2017 बातमीत मांडले होते. तर रेल्वे प्रवासी संघटनांनी रेल्वे मंत्री ते अधिकारी वर्गाकडे तक्रार केली होती. याची दखल रेल्वे प्रशासनाने घेत पोलिस ठाण्याचे दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतल्याने रेल्वे पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. 

कल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याची इमारत धोकादायक झाली असून त्यामुळे रेल्वे प्रवाश्यांची सुरक्षा बघणारे रेल्वे पोलिस यांचा जीव टांगणीला लागल्याचे चित्र दैनिक 'सकाळ'ने 7 सप्टेंबर 2017 बातमीत मांडले होते. तर रेल्वे प्रवासी संघटनांनी रेल्वे मंत्री ते अधिकारी वर्गाकडे तक्रार केली होती. याची दखल रेल्वे प्रशासनाने घेत पोलिस ठाण्याचे दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतल्याने रेल्वे पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. 

मध्य रेल्वेमार्गावरील महत्वाच्या रेल्वे स्थानक मानणाऱ्या कल्याण ते कसारा आणि कल्याण ते बदलापुर रेल्वे स्थानकादरम्यानची सुरक्षा सांभाळणाऱ्या कल्याण रेल्वे स्थानक परिसरात 75 वर्ष जुनी रेल्वे पोलिस ठाण्याची इमारत आहेत. या इमारत मध्ये 209 अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. कल्याण रेल्वे स्थानक महत्वाचे स्थानक असल्याने प्रवासी वर्गाची 24 तास वर्दळ असते. मोबाईल हरविला, नातेवाईक हरविले, अपघात झाला आदी तक्रारी घेऊन नागरिक नेहमीच या पोलिस ठाण्यात येत असतात. दरम्यान कल्याण ते कसारा आणि कल्याण ते बदलापुर या रेल्वे स्थानकादरम्यान सुरक्षा सांभाळणाऱ्या कल्याण रेल्वे पोलिसांचा जीव गेली तीन वर्ष धोक्यात आला आहे. पोलिस ठाण्याच्या भिंतीना तडे गेले असून कौलारु असलेल्या छप्पर धोकादायक झाले आहेत. अनेक ठिकाणी भिंतींना येत असलेल्या गळतीमुळे भर पावसात आपला जीव मुठीत ठेवून काम करावे लागते. अनेकवेळा पावसाचे पाणी पोलिस ठाण्यात साचु नये म्हणून तेथे मोटर लावण्यात आली आहे. पोलिस सुरक्षित नसतील तर प्रवासी वर्गाची कशी सुरक्षा करणार? असा सवाल कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनाने रेल्वे प्रशासनाला केला होता. 

पोलिस ठाण्यात दलदल, मुद्देमाल खोलीमध्ये छप्पर तुटला असून अनेक ठिकाणी भिंतीना तडे गेले आहे. जुनाट इमारतीमुळे रेल्वे पोलिस अधिकारी कर्मचारी वर्गाचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत स्थानिक रेल्वे पोलिस ठाण्यामधून वरिष्ठ अधिकारी वर्गाला मागील 2 वर्षापासून पाठपुरावा सुरु आहे. रेल्वे पोलिस आयुक्तांनी 23 जानेवारी 2017 रोजी कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याची दुरावस्थेबाबत रेल्वे प्रशासनाचे लक्ष्य वेधले आहे. दुरुस्ती करण्याचे पत्र दिले होते, त्यावेळी मात्र रेल्वे प्रशासनाकडून कुठलीही कारवाई झाली नसल्याने स्थानिक पोलिस कर्मचारी वर्गात संताप व्यक्त केला जात होता. तर कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना सचिव श्याम उबाळे आणि अन्य पदाधिकारी वर्गाने रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि रेल्वे प्रशासनाकडे कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याच्या धोकादायक इमारतीच्या दुरुस्तीबाबत लक्ष वेधले असल्याची बातमी दैनिक 'सकाळ'मध्ये 7 सप्टेंबर 2017 बातमी प्रकाशित होताच प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या. 

अखेर कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याच्या दुरुस्तीच्या कामास सुरुवात झाल्याने तेथील पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. नव्याने रेल्वे पोलिस ठाणे बांधणे अपेक्षित होते. मात्र रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे काहीसा दिलासा असला तरी नवीन इमारत बाबत पाठपुरावा करू अशी माहिती कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना सचिव श्याम उबाळे यांनी 'सकाळ'ला दिली. पोलिस बांधव अनेक वर्षे पोलिस ठाण्याच्या धोकादायक इमारतीमध्ये कामकाज करत होते. आता दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रीया कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर पिंगळे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mumbai kalyan police station building