अरबी समुद्रातील वादळ शमणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

मुंबई  - श्रीलंकेजवळील अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे हळूहळू वादळात रूपांतर होत असल्याचे निरीक्षण केंद्रीय वेधशाळेने नोंदवले होते; मात्र आता या पट्ट्याची तीव्रता कमी होत असल्याचे वेधशाळेतील अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले.

समुद्रात तयार झालेला न्यून कमी दाबाचा पट्टा बुधवारी मिनीकॉनच्या आग्नेय दिशेला 50 किलोमीटर अंतरावर, तिरुअनंतपुरमहून नैर्ऋत्य दिशेच्या 380 किलोमीटरवर; तर मालदीवच्या उत्तरेला 430 किलोमीटरवर होता. गुरुवारपर्यंत अरबी समुद्राच्या आग्नेय भागांत या पट्ट्याची तीव्रता कमी होईल, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली. बुधवारी केरळ, तमिळनाडू आणि लक्षद्वीपमधील बहुतांश भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडला. दोन दिवस तेथे पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

Web Title: marathi news mumbai news arabian sea storm