मुंबईत यंग उमरखाडी क्रीडा मंडळ आणि गोविंदा पथकाचे रक्तदान शिबीर 

दिनेश चिलप मराठे
सोमवार, 15 जानेवारी 2018

मुंबई : दक्षिण मुंबईतील नावाजलेल्या यंग उमरखाडी क्रीडा मंडळ व गोविंदा पथक यांनी 25 व्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 120 पाऊच रक्त संकलित झाल्याने मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शिबीराचे उद्घाटन पांडुरंग सकपाळ यांनी केले. विभागातील तरुण तरुणींनी रक्तदानाचा संकल्प करीत उत्साहात रक्तदान केले. त्यांनी आपल्या सामाजिक कर्तव्याचे पालन केले. 

सेंट जॉर्ज ब्लड बँक आणि महानगर ब्लड बँक जेजे यांनी रक्तदाना बद्दल समाधान व्यक्त केले. मंडळाचे कार्यकर्ते आनंद भोई, मंगेश बेलोसे, वैभव प्रधान, प्रल्हाद भोई, मधुकर भोई, वीरेंद्र पाटील, कमलेश भोईर आणि भरत मुळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिबिर यशस्वी होण्यास विशेष परिश्रम घेतले. खासदार अरविंद सावंत याच्या तर्फे शिबिरास खास शुभेच्छा देण्यात आल्या.

डोंगरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भागडीकर आणि उपनिरीक्षक देवीदास पडलवार यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. विभागातील विविध मंडळ, संस्था, राजकीय पक्ष सदस्य आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केले. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवसेना विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ म्हणाले की रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे. आपल्या सर्वांचे एक नागरिक म्हणून रक्तदान करने हे आद्य कर्तव्य आहे. दक्षिण मुंबईत जास्तीत जास्त मंडळांनी अशी जीवनदायी रक्तदान शिबिरे आयोजित करावीत. गरजू रुग्णांना जास्तीत जास्त मदत होईल असे पहावे. आमच्या कडून अशा कार्यक्रमास नेहमीच सहकार्य राहील.

Web Title: Marathi news mumbai news blood donation camp