मोखाडा-नांदगाव बसला अपघात, चालकासह तीनजण जखमी 

भगवान खैरनार
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

मोखाडा : मोखाडाहुन नांदगावला जाणाऱ्या बसला शिवली गावाजवळ अपघात झाला आहे. यामध्ये बस चालक प्रल्हाद जागले, अनुसया जाबर (वय 54), प्रतिभा वाघचौरे (वय 17) हे जखमी झाले आहेत. जखमींना नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

मोखाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, सदर बस मोखड्याहुन नांदगावकडे जात होती. या बसमध्ये एकूण 10  प्रवासी होते. नांदगावकडे जात असताना, समोरून आलेल्या ट्रकने हुलकावणी दिल्याने बस रस्त्याच्या साईड पट्टीवरुन खाली घसरून डाव्या बाजूला पलटी झाली आहे. यामध्ये सुदैवाने कसलीही जिवीत हानी झाली नाही. याबाबत मोखाडा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Marathi news mumbai news bus accident 3 injured